Also visit www.atgnews.com
फेरपरीक्षांसाठी सीबीएसई बोर्डाची तयारी; २२ सप्टेंबरपासून परीक्षा
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) इयत्ता दहावी आणि बारावीच्या फेरपरीक्षा २२ सप्टेंबरपासून घेणार आहे. या परीक्षा देण्यासाठी दहावीचे विद्यार्थी लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच घराबाहेर पडणार आहेत. बारावीचे विद्यार्थी यापूर्वी जेईई आणि नीट परीक्षांच्या निमित्ताने परीक्षा केंद्रांपर्यंत जाऊन आले आहेत. किंवा कंपार्टमेंट परीक्षा म्हणजे नियमित परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या परीक्षा आहेत. दहावी आणि बारावीच्या फेरपरीक्षा २२ सप्टेंबर पासून सुरू होणार आहेत. इयत्ता दहावीची परीक्षा २२ सप्टेंबर २०२० ते २८ सप्टेंबर २०२० या कालावधीत घेतली जाणार आहे. इयत्ता बारावीची परीक्षा २२ सप्टेंबर २०२० ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीत होईल. फेरपरीक्षांना विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे कोविड-१९ संसर्ग काळ असतानाही त्यांच्या आयोजनाची भीती नसल्याचे प्राचार्य सांगत आहेत. शिवाय केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशांनुसार आरोग्यविषयक काळजी घेतली जाणार आहे. सीबीएसईने कंपार्टमेंट परीक्षांची पूर्ण तयारी केली आहे. मात्र अनेक राज्यांतील बोर्डांनी दहावी, बारावीच्या फेरपरीक्षांबाबतचा निर्णय घेतलेला नाही. महाराष्ट्रात करोनाचा कहर कमी झालेला नाही. विशेषत: मुंबई, पुणे आणि अन्य शहरी भागात करोना संक्रमित रुग्ण रोज नव्याने पुढे येत आहेत. परिणामी दहावी, बारावी फेरपरीक्षांबाबत महाराष्ट्राने कोणताही निर्णय अद्याप जाहीर केलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर महाराष्ट्रात पदवी परीक्षा होऊ घातल्या आहेत, त्याही ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hBb56p
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments