नीट टॉपर आकांक्षाला दुसरा नव्हे पहिला क्रमांक द्या: योगी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री (UP Chief Minister Yogi Adityanath) यांनी बुधवारी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET 2020) मध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवून देशात दुसरी आलेली यूपीतील विद्यार्थिनी हिचा सन्मान केला. त्यांनी या हुशार विद्यार्थिनीला अव्वल आलेल्या विद्यार्थ्यासोबत संयुक्तपणे प्रथम स्थान देण्याबाबत 'एनटीए'ला पत्र लिहिण्याचे निर्देशही जारी केले. राज्य सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले की, कुशीनगर येथे राहणाऱ्या प्रतिभावान विद्यार्थिनी आकांक्षाचा गौरव करून मुख्यमंत्र्यांनी तिला शुभेच्छा दिल्या. या वेळी त्यांनी जाहीर केले की राज्य सरकार आकांक्षाच्या संपूर्ण शैक्षणिक खर्चाची व्यवस्था करेल. योगी यांनी मुख्य सचिवांना 'नीट'ला पत्र लिहून नीट परीक्षेत पहिला आलेला ओडिशातील शोएब आफताब याच्यासोबत संयुक्तपणे आकांक्षालाही प्रथम क्रमांक देण्याची विनंती करण्याचे निर्देश दिले. नीट २०२० च्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात शोएब आणि आकांक्षा या दोघांनीही १००% गुण मिळवले, परंतु ठरवलेल्या नियमांच्या आधारे आकांक्षाला वयाच्या निकषानुसार गुणवत्ता यादीत दुसरे स्थान देण्यात आले. आकांक्षाच्या घराकडे जाणारा रस्ता दुरुस्त करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आणि राज्य सरकार या हुशार विद्यार्थिनीला सर्वतोपरी मदत देईल असे सांगितले. आकांक्षा राज्यातील सर्व मुलींसाठी आदर्श ठरली आहे, असे योगी म्हणाले आणि तिच्या पालकांचे आणि कुटुंबातील सदस्यांचे अभिनंदन केले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2HNvAkz
via IFTTT

Post a Comment

0 Comments