MAH MCA CET 2020 चे हॉलतिकीट जारी

Admit Card: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने बुधवारी २१ ऑक्टोबर रोजी MAH MCA CET 2020 चं हॉलतिकिट म्हणजेच अॅडमिट कार्ड जारी केलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज भरले आहेत, ते सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतात. cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर जाऊन उमेदवार अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतील किंवा थेट लिंक या वृत्तात पुढे देण्यात आली आहे. उमेदवारांना त्यांचा नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर आणि पासवर्ड देऊन अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येईल. उमेदवारांना अॅडमिट कार्डवर अलिकडच्या काळातील छायाचित्र लावायचे आहे. नोंदणी करताना जे छायाचित्र पाठवले असेल, ते प्राधान्याने लावल्यास उत्तम. अॅडमिट कार्ड आणि ओळखपत्रासह उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळेल. MAH MCA CET कोणत्या अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा? MAH MCA CET 2020 ही प्रवेश परीक्षा मास्टर्स ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स २०२०-२१ या तीन वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जात आहे. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष या परीक्षेचे आयोजन करतो. कोणत्या महाविद्यालयांमध्ये होतात प्रवेश? महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठांशी संलग्न पुढील महाविद्यालयांमध्ये सीईटी स्कोरवर प्रवेश होतात - १) एमसीए कोर्स उपलब्ध असणाऱ्या सर्व शासकीय संस्था २) एमसीए कोर्स उपलब्ध असणारे विद्यापीठ विभाग ३) एमसीए कोर्स उपलब्ध असणारे विद्यापीठ संलग्न संस्था ४) सर्व विनाअनुदानित एमसीए इन्स्टिट्यूट्स


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2HkDyBs
via IFTTT

Post a Comment

0 Comments