Also visit www.atgnews.com
शिक्षकांसाठी खुशखबर! NCTE ने घेतला TET वैधतेबाबत महत्त्वाचा निर्णय
CTET : शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे. नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन (NCTE) ने केंद्रीय शिक्षक पात्रता परिषद आणि अन्य शिक्षक पात्रता परीक्षांसंबंधी (TET) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एनसीटीईचा हा निर्णय लाखो उमेदवारांना मोठा दिलासा देणारा आहे. एनसीटीईने आता सेंट्रल टीचर्स एलिजिबिलीटी टेस्ट किंवा देशातील कोणत्याही अन्य राज्यस्तरीय शिक्षक पात्रता परीक्षेला आतापर्यंत असलेली सात वर्ष वैधतेची मर्यादा हटवली आहे. अलीकडेच एनसीटीईच्या ५० व्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा अर्थ काय? यापूर्वी टीईटीची वैधता सात वर्षांची होती. म्हणजेच जेव्हा परीक्षार्थी परीक्षा उत्तीर्ण होत, तेव्हापासून पुढील सात वर्षांपर्यंत कोणत्याही सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी करण्यास पात्र असत. मात्र एनसीटीईने आता हा निर्णय घेतला आहे की सर्व शिक्षक पात्रता परीक्षांचे प्रमाणपत्र आयुष्यभरासाठी वैध राहील. म्हणजेच आता जे उमेदवार कोणत्याही परीक्षेत यशस्वी होतील, ते नेहमी सरकारी शिक्षक बनण्यास पात्र राहतील. ज्यांनी यापूर्वी टीईटी उत्तीर्ण केले, त्यांचे काय? बैठकीत असं सांगण्यात आलं की जे पूर्वी टीईटी उत्तीर्ण झाले आहेत, ज्यांच्याकडे टीईटी क्वालिफाइड सर्टिफिकेट आहे, त्यांच्यासाठी हा निर्णय लागू होणार नाही नाही यासंबंधी कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर निर्णय घेण्यात येईल. नोटिफिकेशननंतर लागू होणार बदल एनसीटीईने आता यासंबंधी कोणतेही औपचारिक परिपत्रक किंवा तत्सम सूचना जारी केलेली नाही. विविध राज्या पात्रता परीक्षांसाठी संबंधित राज्यांकडून नोटिफिकेशन जारी केले जाईल. त्याचवेळी सीबीएसई बोर्ड देखील अधिकृत संकेतस्थळावर लवकरच यासंबंधी घोषणा करतील. अधिकृत नोटिफिकेशन जारी झाल्यानंतर एनसीटीईद्वारे केलेला हा बदल लागू होणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Tb1t8I
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments