NEET 2020 परीक्षेचा निकाल जाहीर

: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नीट यूजी २०२० परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावर .neet.in येथे जाऊन विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. देशातील एमबीबीएस, बीडीएस या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. AIIMS, JIPMER सह देशातील विविध मेडिकल कॉलेजांमधील एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांसाठी ही परीक्षा होते. १३ सप्टेंबर रोजी झालेल्या या परीक्षेसाठी सुमारे १५.९७ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८५ ते ९० टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ऐन कोविड -१९ संक्रमण काळात झालेल्या या परीक्षेच्या वेळी आरोग्यविषयक सर्व खबरदारी घेण्यात आली होती. असा पाहा निकाल - परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढील स्टेप्स फॉलो कराव्यात. - सर्वात आधी एनटीएची अधिकृत वेबसाईट ntaneet.nic.in वर जा. - यानंतर निकालाच्या लिंकवर क्लिक करा. - आता नीट अॅप्लिकेशन क्रमांक, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिन टाकून सबमिट करा. - नीट २०२० निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल. - आता निकाल डाऊनलोड करता येईल. भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंटआऊटही काढून ठेवता येईल. अंतिम उत्तरतालिकाही जाहीर दरम्यान, नीटचा निकाल जाहीर होण्याआधी सुमारे अर्ध्या तासापूर्वी एनटीएने नीटची अंतिम उत्तरतालिका देखील जारी केली. अंतिम उत्तरतालिका एनटीएचे अधिकृत संकेतस्थळ ntaneet.nic.in वर जारी करण्यात आली आहे. ही उत्तरतालिका डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंक या वृत्तात पुढे देत आहोत. कशी करायची 2020 Answer Key डाऊनलोड? - सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ .nic.in किंवा ntaneet.nic.in वर जा. - यानंतर NEET 2020 Answer Key पर्यायावर क्लिक कला. - आता तुम्ही अंतिम उत्तरतालिका डाऊनलोड करू शकाल. दोन वेळा झाली परीक्षा ज्या विद्यार्थ्यांना कोविड-१९ संसर्ग किंवा कंटेन्मेंट झोनमध्ये असल्याकारणाने परीक्षा देता आली नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा घेण्यात आली. अशा सुमारे २९० विद्यार्थ्यांनी १४ ऑक्टोबर २०२० रोजी परीक्षा दिली. 2020 Answer Key डाऊनलोड करण्यासाठी NEET Result 2020 पाहण्यासाठी NTA च्या संकेतस्थळावर जाण्यासाठी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kgTEKo
via IFTTT

Post a Comment

0 Comments