ATKT Exams: पुणे विद्यापीठाच्या बॅकलॉग परीक्षा डिसेंबरमध्ये

म. टा. प्रतिनिधी, पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अंतिम वर्ष वगळता, इतर वर्षातील बॅकलॉग विषयांसाठी परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या असून, त्यानुसार ही परीक्षा ३ ते १६ डिसेंबर या कालावधीत ही परीक्षा होणार आहे. याच कालावधीत श्रेणीसुधार आणि बहि:स्थ अभ्यासक्रमातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी माहिती परीक्षा व बॅकलॉगसह अन्य अभ्यासक्रमांच्या परीक्षा केवळ ऑनलाइन माध्यमातून सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत घेण्यत येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल, लॅपटॉप, संगणक किंवा टॅब यापैकी कुठलीही सुविधा ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी उपलब्ध नाही, त्यांनी आपपल्या महाविद्यालयात किंवा जवळच्या महाविद्यालयात जाऊन, त्या महाविद्यालयांकडे उपलब्ध संगणक कक्षातील सुविधा वापरून संबंधित विषयांची ऑनलाइन पद्धतीने परीक्षा द्यावी, असेही विद्यापीठाकडून महाविद्यालयांना सूचित करण्यात आले आहे. या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जातील, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी दिली. एप्रिलमध्ये होऊ न शकलेल्या बॅकलॉग विषयाच्या प्रात्यक्षिक, मौखिक, प्रोजेक्‍ट, सेमिनार व अन्य महाविद्यालयातील स्तरावरील परीक्षांचे आयोजन करोनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांसह करावेत. महाविद्यालयातील शिक्षकांनी त्यांच्या बीसीयूडी लॉगइनमधून सर्व संबंधित विद्यार्थ्यांचे गुण विद्यापीठाच्या लिंकचा उपयोग करून ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदवावेत, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mZTZ5j
via IFTTT

Post a Comment

0 Comments