Also visit www.atgnews.com
मुंबई विद्यापीठात युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज सेलची स्थापना
मुंबई: नवीन शैक्षणिक धोरणानुसार मूल्यशिक्षणास चालना आणि बळकटी देण्यासाठी आज मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी विद्यापीठात युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज सेलची स्थापना केली. विद्यापीठातील शैक्षणिक विभाग आणि सलंग्नित महाविद्यालयांमध्ये मुल्य शिक्षणाची रुजूवात करून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना नवोपक्रम आणि नवसंकल्पनाची जोड देण्याच्या उद्देश्याने या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अंतर्गत शिक्षकांना मुल्य शिक्षणासाठी समर्थ करण्याच्या उद्देश्यानेही या कक्षाच्या स्थापना महत्वाची असणार आहे. विद्यापीठाच्या आयक्यूएसीच्या समन्वयाने ‘नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठातील मुल्य शिक्षण’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन चर्चासत्रा दरम्यान या कक्षाची स्थापना करण्यात आली. शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये मूल्यशिक्षणाची सांगड घालून सहानुभूती, करूणा, वैविध्यतेबद्दल आदर आणि विद्यार्थ्यांना सार्वत्रिक मानवी मुल्यांची ओळख करून देण्याच्या उद्देश्याने स्थापन करण्यात आलेल्या या कक्षाची भूमिका महत्वाची ठरणार असल्याचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले. तसेच आयईएस मॅनेजमेंट आणि रिसर्च सेंटर येथे युएचव्ही-२ वर आधारीत ३ क्रेडीट कोर अभ्यासक्रम सुरु केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या चर्चासत्रामध्ये उदघाटनपर भाषण विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी केले. एआयसीटीईच्या एनसीसी-आयपीचे अध्यक्ष डॉ. रजनीश अरोरा यांनी 'होलिस्टिक आणि मल्टी-डिसिप्लिनरी एज्युकेशन मधील यूएचव्हीची भूमिका' यावर भाष्य केले. तर एआयसीटीई चे प्रादेशिक विभाग, प्रादेशिक अधिकारी डॉ. अजित सिंह यांनी “यूएचव्हीवरील मार्गदर्शक तत्त्वे” यावर भाष्य केले. राजुल अस्थाना, एआयसीटीईचे एनसीसी-आयपी सदस्य, 'यूएचव्ही अंमलबजावणी मार्गदर्शक तत्त्वे आणि संचालक / प्रधानांची भूमिका' यावर चर्चा केली. मुंबई विद्यापीठाच्या यूएचव्ही सेलच्या समन्वयक प्रा.विभा सुराणा यांनी स्वागतपर भाषण व प्रास्ताविक केले. तर डॉ. मेहर भूत आणि डॉ. मोहन राव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आयक्यूएसीच्या संचालिका प्रा. स्मिता शुक्ला यांनी समारोप व आभार मानले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lSocDi
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments