बालदिनही होणार ऑनलाइन साजरा

2020: करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद असून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येत आहे. याच कालावधीत विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी शिक्षण विभागाने सप्ताह सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी १४ नोव्हेंबरला बालदिन साजरा करण्यात येतो. यानिमित्त बालकांच्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी राज्यातील सर्व शाळांमधील पहिली ते १२च्या विद्यार्थ्यांसाठी ८ ते १४ नोव्हेंबरदरम्यान सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाकडून विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहे. हा उपक्रम सात गटांमध्ये होणार आहे. यामध्ये पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना 'मी नेहरू बोलतोय' या विषयावर तीन मिनिटांचा व्हिडीओ अपलोड करायचा आहे. तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना 'पत्रलेखन' हा विषय असून, त्यांना चाचा नेहरूंना पत्र लिहायचे आहे. सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कविता वाचन आणि नेहरूंच्या जीवनावर एकपात्री, नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वांतत्र्य संग्रामातील नेहरूंच्या जीवनावरील पोस्टर तयार करणे व निबंधलेखन स्पर्धा आहे. ११वी व १२वीच्या विद्यार्थ्यांना निबंधलेखन आणि व्हिडीओ तयार करणे असे विविध उपक्रम निश्चित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर पहिली ते १२च्या विद्यार्थ्यांना नेहरूंशी संबंधित कथा, कविता, प्रसंग सादर करणे या माध्यमातून ई-संमेलन आयोजित करता येणार आहे. विद्यार्थ्यांनी बनवलेले व्हिडीओ, निबंध, कविता, पत्रलेखन, ई-संमेलनाचे फोटो हे पालक, शिक्षकांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून baldivas2020 या हॅशटॅगवरून अपलोड करता येणार आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38ohcKj
via IFTTT

Post a Comment

0 Comments