MHT-CET चा निकाल कधी? जाणून घ्या...

MHT CET Answer Key 2020: महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत MHT-CET 2020 परीक्षेची उत्तरतालिका १० नोव्हेंबर २०२० रोजी जारी करण्यात येणार आहे. सीईटी कक्षाने आपल्या अधिकृत वेबसाइटवर यासंबंधीचे परिपत्रक जारी केले आहे. परीक्षा ज्या विद्यार्थ्यांनी दिली आहे ते www.mahacet.org या संकेतस्थळावरून परीक्षेची उत्तरतालिका डाऊनलोड करू शकतात. या प्रोव्हिजनल उत्तरतालिकेवर जर काही आक्षेप असतील तर तेही नोंदवण्यात येतील, आक्षेप नोंदवण्यासाठी विद्यार्थ्यांना १२ नोव्हेंबर २०२० पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. शिवाय परिपत्रकानुसार, राज्य २८ नोव्हेंबर २०२० रोजी किंवा त्या पूर्वी MHT CET 2020 परीक्षेचा निकाल जारी करणार ाहे. MHT CET Answer Key 2020: उत्तरतालिका अशी पाहता येईल - - सर्वात आधी अधिकृ वेबसाइट mahacet.org वर जा. - यानंतर होम पेज वर उपलब्ध आन्सर की च्या लिंकवर क्लिक करा. - आता विचारलेली माहिती भरा. - MHT CET उत्तरतालिका 2020 तुमच्या स्क्रीन वर दिसू लागेल. - आता तुम्ही आन्सर की डाऊनलोड करून तिचं प्रिंट आऊट घेऊ शकाल. १ ते ९ ऑक्टोबर आणि १२ ते २० ऑक्टोबर २०२० या कालावधीत एमएचटी-सीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र काही नैसर्गिक आणि आपत्कालीन संकटांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचता आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी सीईटी सेलने या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी उपलब्ध करून दिली होती. सीईटी परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा ७ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. सीईटीच्या वेबसाइटवर जाण्यासाठी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2IcmG0i
via IFTTT

Post a Comment

0 Comments