इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये अप्रेंटिसशीप भरती

Indian Oil 2020: इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेडकडे (IOCL) मध्ये अप्रेंटिसची शेकडो रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आयटीआय () किंवा अभियांत्रिकी पदविका (Engineering Diploma) करणाऱ्या तरुणांना शासकीय नोकरी (Govt. Job) मिळण्याची ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या बातमीमध्ये, आपल्याला रिक्त जागांचा तपशील आणि सोबतच आयओसीएलद्वारे जॉब नोटिफिकेशन आणि ऑनलाइन अर्जासाठी लिंक्स उपलब्ध करून देण्यात येत आहे. कोणत्या पदांवर भरती होईल? टेक्निशियन अप्रेंटिस- २२२ पदे ट्रेड अप्रेंटिस - २१४ पदे एकूण पदांची संख्या - ४३६ आवश्यक तारखा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार - २३ नोव्हेंबर २०२० अर्ज करण्याची शेवटची तारीख - १ डिसेंबर २०२० प्रवेश पत्र डाउनलोड करण्याची संभाव्य तारीख - २२ डिसेंबर २०२० लेखी परीक्षेची संभाव्य तारीख - ०३ जानेवारी २०२१ अर्ज करण्यासाठी कोणताही शुल्क भरावा लागणार नाही. ही प्रक्रिया सर्वांसाठी विनामूल्य आहे. आवश्यक पात्रता टेक्निशियन अप्रेंटिससाठी - संबंधित अभियांत्रिकी विद्याशाखेतील तीन वर्षांचा पूर्णवेळ डिप्लोमा. ट्रेड अ‍ॅप्रेंटिससाठी - कोणत्याही एनसीव्हीटी / एससीव्हीटी मान्यताप्राप्त आयटीआय संबंधित विद्याशाखेत पूर्णवेळ अभ्यासक्रम. वयोमर्यादाउमेदवारांचे वय किमान १८ वर्षे आणि जास्तीत जास्त २४ वर्षे असणे आवश्यक आहे. राखीव वर्गासाठी कमाल वयोमर्यादेमध्ये सवलत असेल. आयओसीएल अ‍ॅप्रेंटिस अधिसूचना 2020 या थेट दुव्यासाठी येथे क्लिक करा. अर्ज करण्यासाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3l2bErB
via IFTTT

Post a Comment

0 Comments