अवघा ६ वर्षांचा भारतीय मुलगा कॉम्प्युटर प्रोग्रामर! गिनीज जागतिक विक्रमात नोंद

अहमदाबाद येथील अवघ्या सहा वर्षांच्या मुलाची गिनीज जागतिक विक्रमांमध्ये नोंद झाली आहे. या चिमुरड्याने जगातील सर्वाधिक कमी वयाचा कॉम्प्युटर प्रोग्रामर बनण्याचा विक्रम केला आहे. त्याने पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज क्लिअर करत हा विक्रम स्वत:च्या नावावर नोंदवला आहे. असे या मुलाचे नाव असून तो दुसरीत शिकत आहे. त्याने पिअर्सन VUE टेस्ट सेंटरमधून परीक्षा देत मायक्रोसॉफ्ट प्रमाणपत्र मिळवले. तो म्हणाला, 'मला माझ्या वडिलांनी कोडिंग शिकवलं. मी दोन वर्षांचा असल्यापासून टॅबलेट वापरायचो. तिसऱ्या वर्षी आयओएस आणि विंडोजसारखे गॅजेट घेतले. नंतर मला कळलं की माझे वडील पायथॉनवर काम करत होते.' तो म्हणतो, 'मला पायथॉनकडून सर्टिफिकेट मिळालं, तेव्हा मी लहान खेळ तयार करत होतो. त्यानंतर त्यांनी मला कामाचा पुरावा पाठवायला सांगितला. काही महिन्यांनंतर त्यांनी माझ्या कामाला मान्यता दिली आणि माझी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली.' अर्हमला उद्योजक होऊन प्रत्येकाची मदत करायची आहे. त्याला अॅप्स, गेम्स आणि कोडिंगसाठी सिस्टिम्स बनवायच्या आहेत, असं तो सांगतो. अर्हमचे वडील ओम तलसानिया सॉफ्टवेअर इंजिनीअर आहेत. ते म्हणाले, 'अर्हमला कोडिंगमध्ये इंटरेस्ट होता म्हणून मी त्याला बेसिक प्रोग्रामिंग शिकवलं. त्याला खूप लहान असल्यापासून गॅजेट्सची आवड होती. तो टॅबवर गेम्स खेळायचा. कोडी सोडवायचा. त्याला जेव्हा व्हिडिओ गेम्स खेळणं आवडायला लागलं, तेव्हा ते त्याला बनवून पाहायचे होते. मला कोडिंगचं काम करताना तो पाहायचा. मी त्याला बेसिक प्रोग्रामिंग शिकवलं आणि तो स्वत:चे लहान लहान गेम्स बनवू लागला. मायक्रोसॉफ्ट टेक्नॉलॉजी असोसिएट अशी ओळख त्याला मिळाली. मग आम्ही गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डसाठी अर्ज केला.'


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Ud0IMQ
via IFTTT

Post a Comment

0 Comments