CPO Sub Inspector SI PET/PST परीक्षेचं अॅडमिट कार्ड जारी

CPO Sub Inspector SI 2019 PET/PST: स्टाफ सिलेक्शन कमिशनने CPO Sub Inspector SI 2019 PET/PST परीक्षेचं अॅडमिट कार्ड जारी केलं आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर हे अॅडमिट कार्ड ऑनलाइन जारी झालं आहे. परीक्षा पेपर १ आणि पेपर २ अशी दोन भागात असते. पेपर १ मध्ये फिजिकल स्टॅंडर्ड टेस्ट (PST) किंवा फिजिकल एड्युरन्स टेस्ट (PET) असेल आणि पेपर २ आणि DME असेल. या सर्व पायऱ्या अनिवार्य आहेत. ज्या उमेदवारांनी पेपर १ दिली आहे त्यांना आता फिजिकल स्टॅंडर्ड टेस्ट (PST) किंवा फिजिकल एड्युरन्स टेस्ट (PET) द्यावयाची आहे. PST किंवा PET ला गुण नसतात मात्र या परीक्षेत पात्र व्हावे लागते. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या माजी सैनिकांना PET द्यावी लागत नाही. मात्र लेखी परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागते आणि थेट नियुक्तीसाठी आवश्यक शारीरिक मापदंडांमध्ये बसणं अनिवार्य असतं.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36lzj0P
via IFTTT

Post a Comment

0 Comments