MHT CET Answer Key एमएचटी-सीईटीची उत्तरतालिका जारी

MHT CET 2020: महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने परीक्षेची उत्तरतालिका जारी केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, ते सीईटी सेलची अधिकृत वेबसाईट mhtcet2020.mahaonline.gov.in वरून आन्सर की डाऊनलोड करू शकतात. आन्सर कीमध्ये परीक्षेत विचारलेल्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे देण्यात आली आहेत. आन्सर की व्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी रिस्पॉन्स शीट देखील जारी केली आहे. राज्य सीईटी कक्षाने MHT CET प्रोव्हिजनल आन्सर की वर काही हरकत असेल तर ती नोंदवण्यासाठी देखील मुदत दिली आहे. उमेदवार १२ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी १ वाजेपर्यंत आपले आक्षेप नोंदवू शकतात. आन्सर की वर हरकत नोंदवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक हरकतीसाठी एक हजार रुपये याप्रमाणे शुल्क भरावे लागेल. यानंतर अंतिम उत्तर तालिका २८ नोव्हेंबर रोजी जारी केली जाईल. MHT CET 2020 Answer Key अशी करा डाऊनलोड - सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ mhtcet2020.mahaonline.gov.in वर जा. - यानंतर विचारलेली सर्व माहिती भरा. - आता MHT CET आन्सर की च्या लिंक वर क्लिक करा. - आता सर्व माहिती सबमीट करून आन्सर की डाऊनलोड करा. MHT CET Answer Key वर हरकत कशी नोंदवायची?.. जाणून घ्या... - सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ mhtcet2020.mahaonline.gov.in वर जा. - आता आपल्या पासवर्ड आणि आयडीच्या मदतीने लॉग इन करा. - यानंतर प्रोसीट बटण क्लिक करा. - यानंतर ऑब्जेक्शन फॉर्मवर क्लिक करा. - आता सर्व माहिती भरून सबमीट करा. निकाल कधी? सीईटी कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, एमएचटी सीईटीचा निकाल (MHT-CET Result) २८ नोव्हेंबर किंवा त्यापूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे. यावर्षी सुमारे ४.३५ लाख उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/32v94DZ
via IFTTT

Post a Comment

0 Comments