Also visit www.atgnews.com
MHT CET: २३ प्रश्नांचे पर्याय चुकले; चुकीच्या प्रश्नांचे गुण मिळणार
MHT CET 2020: राज्य प्रवेश परीक्षा कक्षाने घेतलेल्या या परीक्षेत २३ प्रश्नांच्या उत्तरांचे पर्याय चुकीचे असल्याचे समोर आले आहे. यामुळे हे प्रश्न सोडविणाऱ्या किंवा सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या प्रश्नांचे गुण देण्यात येणार असल्याचे कक्षातर्फे जाहीर करण्यात आले आहे. मात्र हे चुकीचे प्रश्न ज्या सत्रात आले होते, त्या सत्रातील विद्यार्थ्यांना हे गुण देण्यात येणार आहेत, असे कक्षाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरात सीईटी परीक्षा सुमारे २०० केंद्रांवर घेण्यात आली. ही परीक्षा पीसीबी गटासाठी १६ सत्रांत, तर पीसीएम गटासाठी १४ सत्रांत अशा एकूण ३२ सत्रांमध्ये घेण्यात आली. या प्रत्येक सत्रात प्रश्नपत्रिकांचे वेगवेगळे संच विद्यार्थ्यांना दिले जात होते. राज्यभरातून पाच लाख ४२ हजार ९०५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी तीन लाख ८३ हजार ७३६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली. करोनाच्या प्रादुर्भावाच्या काळात सीईटी सेलने नियोजन करून ही परीक्षा यशस्वीपणे पार पाडली. या परीक्षेसंदर्भात हरकती नोंदवण्याचे आवाहन केल्यानंतर सुमारे ७९१ विद्यार्थ्यांनी विविध हरकती नोंदवल्या होत्या. त्यापैकी ६५ हरकती योग्य असल्याचे समोर आले. त्यापैकी उत्तरांचा पर्याय देताना काही चुका झाल्याचे समोर आले आहे. यामुळे ज्या सत्रातील प्रश्नपत्रिका संचात हे चुकीचे पर्याय असलेले प्रश्न होते, त्या सत्रातील विद्यार्थ्यांना गुणदान दिले जाणार आहे. याबाबतचा सविस्तर तपशील कक्षाने वेबसाइटवर जाहीर केला आहे. यामध्ये सर्वाधिक पात्र झालेल्या हरकतीमधील जीवशास्त्र विषयासाठी ३५, गणितासाठी ५, रसायनशास्त्र १२ आणि भौतिकशास्त्रासाठी १३ अशा हरकती दाखल झाल्या होत्या, अशी माहिती कक्षाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pI3HLM
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments