Also visit www.atgnews.com
बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स: कॅप राउंडचे वेळापत्रक जारी
महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा (MHT CET) 2020 चे काऊन्सेलिंग शेड्युल सीईटी कक्षाने जारी केले आहे. (BFA) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी हे वेळापत्रक सीईटी कक्षाने या अधिकृत संकेतस्थळावर जारी केले आहे. ज्या उमेदवारांना कोर्ससाठी कॅप राउंडसाठी नोंदणी करायची आहे, ते या अधिकृत संकेतस्थळावरून नोंदणी करू शकतात. ही प्रवेश प्रक्रिया ५ डिसेंबर २०२० पासून सुरू होणार आहे. BFA Counselling CAP साठी नोंदणीची अंतिम मुदत १० डिसेंबर २०२० आहे. कागदपत्रांची ई-पडताळणी ७ आणि ११ डिसेंबर रोजी होणार आहे. अंतिम यादी १४ डिसेंबर रोजी जाहीर होईल. mahacet.org वर १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता विद्यार्थ्यांना यादी पाहता येईल. हरकती घेण्यासाठी १५ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते रात्री ११.५९ पर्यंतचा वेळ आहे. अधिक माहिती आणि वेळापत्रकासाठी उमेदवारांनी सीईटीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/33DHo0z
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments