IIT Roorkee च्या विद्यार्थ्यांना ७ आंतरराष्ट्रीय जॉब आफर्स!

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी () रुरकीमध्ये १ डिसेंबरपासून कॅम्पस प्लेसमेंटला (IIT placements ) सुरुवात झाली आहे. गुरुवारी या प्रक्रियेचा तिसरा दिवस होता. तीन दिवसांत संस्थेला तब्बर ४८४ जॉब ऑफर्स आल्या. यावर्षी कोविड-१९ महामारी सारखं संकट समोर उभं ठाकलेलं असतानाही आयआयटी रुरकीच्या विद्यार्थ्यांना तब्बल सात आंतरराष्ट्रीय जॉब ऑफर्स मिळाल्या आहेत. यापैकी टॉप डोमेस्टिक ऑफरचं पॅकेज वार्षिक ८० लाख रुपये आहे. तीन दिवसांत एकूण १०७ कंपन्यांनी पहिल्या फेरीत सहभाग घेतला. यात अॅक्सिस बँक, असेंच्युअर जापान, अॅडलॉइड, क्लुमिओ, डीजी तकानो कं. लि., स्टँडर्ड चार्टर्ड, ऑइल इंडिया लि., आइस्ट्रिस आदी कंपन्यांचा समावेश आहे. एकूण २७२ जॉब ऑफर्स पहिल्याच दिवशी आल्या. यापैकी १५३ प्री प्लेसमेंट सेशनमध्ये आल्या होत्या. गेल्या वर्षी प्री प्लेसमेंट सेशनमधून १३९ जॉब ऑफर्स आल्या होत्या. अॅमेझॉन, जॅग्वॉर लँड रोव्हर, जे.पी. मॉर्गन, मायक्रोसॉफ्ट सारख्या आघाडीच्या कंपन्यांनी विद्यार्थ्यांना नोकऱ्या देऊ केल्या आहेत. गेल्या वर्षी सर्वाधिक पॅकेज वार्षिक ६० लाखांचे होते. यावर्षी त्यात ८० लाखांपर्यंत वाढ झाली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mDIUah
via IFTTT

Post a Comment

0 Comments