Also visit www.atgnews.com
खासगी मेडिकल कॉलेजच्या निवासी डॉक्टरांनाही स्टायपेंडवाढ
म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्यातील खासगी वैद्यकीय व दंत वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमएस, एमडी, एमडीएस अशा पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत, संलग्न रुग्णालयात सेवा देणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या स्टायपेंडमध्ये दरमहा १० हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय शुल्क नियामक प्राधिकरणाने (एफआरए) घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी राज्यातील सर्व खासगी वैद्यकीय कॉलेजांनी १ मे महिन्यापासून करायची आहे. दरम्यान, सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना ही वेतनवाढ २ सप्टेंबरच्या निर्णयानुसार करण्यात आली आहे. राज्यातील सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील संलग्न रुग्णालयात आपला जीव धोक्यात घालून करोना वॉर्डात संसर्गाची सामना करीत आहेत; तसेच संशयित रुग्णांची सेवा करीत आहे. करोनाचे रुग्णसंसख्या अधिक असणाऱ्या ठिकाणी ही रुग्णसेवा २४ बाय ७ होत असल्याचे चित्र आहे. करोना विरुद्धच्या लढाईत जीवाची परवा न करता सेवा देणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या मागण्यांकडे राज्य सरकारने दुर्लक्ष करण्यात येत होते. याबाबत महाराष्ट्र टाइम्सने वेळोवेळी वृत्ताद्वारे प्रकाश टाकला. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत सरकारी महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना दरमहा १० हजार रुपये वाढीचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर २ सप्टेंबर रोजी वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाने या निवासी डॉक्टरांना मे महिन्यापासून १० हजार रुपये वाढीव वेतन देण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, या निर्णयात खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांचा उल्लेख नसल्याने, त्यांच्यावर एकप्रकारे अन्याय झाला आहे. राज्य सरकारने सरकारी आणि खासगी डॉक्टर यांच्यामध्ये स्टायपेंड वाढीतून भेदभाव करण्याचा प्रकार केल्याची भावना विद्यार्थ्यांकडून व्यक्त झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी याबाबत एफआरए आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे (डीएमइआर) तक्रारी केल्या. या सर्वांवर चर्चा होऊन एफआरएने खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना मे २०२० पासून १० हजार रुपये वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी उत्स्फूर्तपणे करण्याचे आदेश महाविद्यालयाच्या प्रशासनाला दिले आहेत. या बैठकीला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि डीएमइआरचे प्रतिनिधी उपस्थित होते. स्टायपेंड मिळत नसल्यास तक्रार करा एखाद्या कॉलेजकडून स्टायपेंडची रक्कम दिली जात नसल्यास, त्या कॉलेजची तक्रार डीएमइआर आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे करावी, अशी माहिती पत्रकात दिली आहे. त्याचप्रमाणे एफआरएच्या http://www.sssamiti.org या वेबसाइटवर तक्रार दाखल करण्याचे आवाहन एफआरएच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36vbzJ4
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments