'सैनिकी सेवापूर्व'ची प्रवेशप्रक्रिया जाहीर

म. टा. प्रतिनिधी, पुणे औरंगाबादच्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था (सर्व्हिसेस प्रेपरेटरी इन्स्टिट्यूट) येथील प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाइन अर्ज www.spiaurangabad.com या वेबसाइटवर उपलब्ध असून, येत्या २७ जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी आहे. सध्या दहावीत शिकत असणारे विद्यार्थी ज्यांची जन्मतारीख २ जानेवारी २००४ ते १ जानेवारी २००७ या कालावधीतील आहे; तसेच जून २०२१ मध्ये इयत्ता अकरावीत प्रवेश घेण्यासाठी पात्र असणारे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र समजले जाणार आहेत. प्रवेशासाठी लेखी परीक्षा मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर,औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि लातूर या आठ केंद्रांवर एकाच दिवशी रविवार १४ फेब्रुवारीला घेतली जाणार आहे. पुणे केंद्रावर पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील तरुणांना परीक्षा देता येणार आहे. संरक्षण दलामध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवकांना मोठ्या संख्येने जाता यावे, यासाठी राज्य सरकारने औरंगाबाद येथे सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची एसपीआयची स्थापना केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून अनेक तरुण भारतीय सशस्त्र दलांमध्ये अधिकारी बनले आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rAVKsE
via IFTTT

Post a Comment

0 Comments