सीबीएसई परीक्षांच्या तारखा 'या' दिवशी होणार जाहीर

CBSE Board Exams 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखेची घोषणा ३१ डिसेंबर रोजी केली जाणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ही माहिती दिली. पोखरियाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. ते स्वत: सायंकाळी ६ वाजता सीबीएसई दहावी, बारावी परीक्षांच्या तारखांची घोषणा करणार आहेत. ही माहिती मिळताच काही विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्र्यांना आग्रह केला की परीक्षेसाठी त्यांना अजून काही कालावधीची गरज आहे. काही विद्यार्थ्यांनी परीक्षा एप्रिल-मेपर्यंत घेऊ नयेत अशीही मागणी केली आहे. काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की अद्याप त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. यापूर्वी शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी हे स्पष्ट केलं आहे की सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा फेब्रुवारी २०२१ नंतरच आयोजित केल्या जाणार आहेत. दरम्यान, बोर्ड परीक्षांच्या तारखा अद्याप स्पष्ट झालेल्या नसल्याने अनेक शाळांनी विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी प्रिलिम परीक्षा आयोजित केल्या आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/37Uu1LQ
via IFTTT

Post a Comment

0 Comments