नोकरी आली धावून: केंद्रामध्ये नोकरीची संधी

- प्रा. आजच्या तरुण पिढीमध्ये स्पर्धा परीक्षा हा शब्द माहिती नाही, असा एकही तरुण आपल्याला भेटणार नाही. सरकारी नोकरी मिळवणं हे अनेकांचं स्वप्न असतं आणि ती मिळवण्यासाठीची जिद्द ही अनेकांच्या मनामध्ये असते. पण, त्यासाठी लागणारे परिश्रम, नियोजन, संयम या गोष्टी अंगभूत असणं आवश्यक असतं. स्पर्धा परीक्षा जिंकण्यासाठी चिकाटी, जिद्द, एकाग्रता, सातत्य, मेहनत, प्रामाणिकपणा आणि संयम हे गुण आवश्यक आहेत. आज अनेक विद्यार्थ्यांमध्ये संयम हा गुण कमी होत असल्याचं दिसून येत आहे. आपण जी परीक्षा देऊ त्या परीक्षेमध्ये यश मिळालंच पाहिजे आणि यश मिळालं नाही तर नकारात्मक दृष्टिकोन वाढतो. स्पर्धा परीक्षात यश प्राप्त करायचं असल्यास काही अभ्यासतंत्रं आणि कौशल्यं आत्मसात करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर अभ्यासाचं नियोजन करता आलं पाहिजे. एखादं मोठं ध्येय तुम्हाला गाठायचं असल्यास त्याची विभागणी करून छोटी-छोटी ध्येय प्राप्त करा म्हणजे मोठं यश मिळवणं सोपं होईल. म्हणूनच म्हणतात ना If you fail to plan, you plan to fail. पुढच्या काही वर्षांत चांगलं जीवन जगायचं असेल तर आता जो वेळ आपल्या हातात आहे त्याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करायला हवा. साधारणपणे दरवर्षी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कम्बाइन्ड हायर सेकेंडरी लेव्हल एक्झामची जाहिरात प्रसिद्ध होते. यावर्षीही ६ नोव्हेंबरपासून अर्ज भरण्याची सुरूवात झालेली आहे. १८ वर्षं पूर्ण असतील आणि बारावीची परीक्षा उत्तीर्ण असेल असा कोणताही उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतो. स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे होणाऱ्या या परीक्षेतून केंद्र सरकारच्या विविध मंत्रालय, विभाग आणि कार्यालयामधील लोअर डिव्हीजनल क्लर्क/ज्युनिअर सेक्रेटरिएट आणि डाटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी भरती होणार आहे. १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. ० परीक्षा दोन स्तरावर होणार आहे - संगणकीकृत टिअर-१ परीक्षा - डिस्क्रीप्टीव्ह टिअर-२ परीक्षा परीक्षा एप्रिलमध्ये होणार आहे. अभ्यासाचं नियोजन आणि सराव करण्यासाठी चांगला वेळ असल्यानं बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आतापासून व्यवस्थितपणे या परीक्षेचा अभ्यास करायला हवा. ० भरती प्रक्रियेचं वेळापत्रक परीक्षा संस्थेचं नाव- स्टाफ सिलेक्शन कमिशन पदाचं नाव- ज्युनिअर क्लर्क, ज्युनिअर असिस्टंट, पोस्टर असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, डाटा एंट्री ऑपरेटर एकूण पदं- पाच हजार शैक्षणिक पात्रता- बारावी उत्तीर्ण वयोमर्यादा- १८ ते २७ वर्षं ऑनलाइन अर्जाची मुदत- ६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर पूर्वपरीक्षा- १२ ते २७ एप्रिल, २०२१ वेबसाइट- www.ssc.nic.in प्रश्नोत्तरं ० मी बीकॉमची परीक्षा दिली आहे. निकाल ऑनलाइन कळला आहे. पण, हातात गुणपत्रिका नाही. अशा परिस्थितीत एसबीआयच्या रिक्त पदांसाठी अर्ज करु शकते का? - तन्वी पांगेरकर हो, तुम्ही अर्ज करु शकता. ० मी एसबीआयच्या पीओ पदासाठी अर्ज केला आहे. त्याबाबत अनेक प्रश्न मनात आहेत. परीक्षेचं हॉल तिकीट कसं मिळेल? परीक्षा कधी होणार? ऑनलाइन की ऑफलाइन होणार? अभ्यास करण्यासाठी कोणती पुस्तकं घेऊ? - रुतिका साळवी परीक्षेच्या दहा दिवस आधी हॉल तिकीट मिळेल. त्यावर परीक्षेचं ठिकाण आणि वेळ दिलेली असेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36Q20EG
via IFTTT

Post a Comment

0 Comments