एलआयसीत भरती; वार्षिक १४ लाखांपर्यंतचे पॅकेज!

LICHFL Vacancy 2020: जीवन विमा निगम (LIC) च्या हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (HFL) मध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. मॅनेजमेंट ट्रेनी ते असिस्टंट मॅनेजर पर्यंतच्या पदांवर भरती होणार आहे. या पदांवर निवड होणाऱ्या उमेदवारांचे पे-स्केल वार्षिक १४ लाख रुपयांपर्यंत आहे. जर तुमच्याकडे एमसीए, बीएससी, बीटेक किंवा बीईची डिग्री असेल तर तुमच्याकडे ही मिळवण्याची चांगली संधी आहे. या नोकऱ्यांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. नोटिफिकेशन आणि अॅप्लिकेशन करण्याच्या थेट लिंक्स पुढे देण्यात आल्या आहेत. पदांची माहिती मॅनेजमेंट ट्रेनी - ९ पदे असिस्टंट मॅनेजर - ११ पदे एकूण संख्या - २० पदे ३० वर्षे वयापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात. आरक्षित प्रवर्गांसाठी कमाल वयोमर्यादेत सवलत आहे. अर्ज कसा करायचा? अर्ज ऑनलाइन माध्यमातून करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२० आहे. पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज भरता येईल. अर्ज प्रक्रिया सर्व उमेदवारांसाठी नि:शुल्क आहे. निवड प्रक्रिया या नोकऱ्यांसाठी कोणतीही परीक्षा होणार नाही. मेरिटच्या आधारे थेट भरती होईल. थेट लिंक्स LICHFL Job Notification पाहण्यासाठी Apply करण्यासाठी


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mGgICR
via IFTTT

Post a Comment

0 Comments