UPSC NDA I परीक्षेसाठी नोंदणी कधीपासून? जाणून घ्या

NDA I 2021: केंद्रीय लोक सेवा आयोग (UPSC) ने राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) आणि नौदल अकादमी (NA) परीक्षेची अधिसूचना जारी केली आहे. एनडीए १ साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ३० डिसेंबर २०२० पासून सुरू होणार आहे. यूपीएससीचे अधिकृत संकेतस्थळ upsconline.nic.in वरून हे अर्ज करता येतील. यूपीएससी एनडीएसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत १९ जानेवारी २०२१ आहे. जे उमेदवार यशस्वीपणे आपला ऑनलाइन अर्ज भरतील, त्यांना UPSC NDA 1 परीक्षेला बसण्याची संधी मिळेल. ही परीक्षा १८ एप्रिल २०२१ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. कशी होणार उमदेवारांची निवड? उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि व्यक्तिमत्त्व चाचणीच्या आधारे होईल. पात्रता राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या सैन्य दलासाठी - उमेदवार बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य. राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या वायू आणि नौदलासाठी - बारावी किंवा समकक्ष परीक्षेत फिजिक्स आणि गणित विषयांसह उत्तीर्ण.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2JtpWF8
via IFTTT

Post a Comment

0 Comments