तमिळनाडूत विद्यार्थ्यांना मोफत डेटा कार्ड

For Students: तमिळनाडू () राज्यातील सुमारे नऊ लाख ६९ हजार विद्यार्थ्यांना प्रतिदिन दोन जीबीचे डेटा कार्ड मोफत देण्याचे तमिळनाडू सरकारने रविवारी जाहीर केले. एप्रिल महिन्यापर्यंत विद्यार्थ्यांना घेणे सुलभ व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी दिली. ‘कोव्हिडमुळे राज्यातील कॉलेज, शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शिक्षण सध्या ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. राज्यातील नऊ लाख ६९ हजार ४७ विद्यार्थी सरकारी, निमसरकारी आणि खासगी कॉलेजांत विविध विद्याशाखांमध्ये शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना जानेवारी ते एप्रिल या दरम्यान दोन जीबी डेटा मोफत देण्यात येणार आहे. ही योजना राज्य सरकारच्या अखत्यारित असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशनच्या साह्याने राबविली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तमिळनाडू सरकार नेहमी तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणाला प्रोत्साहन देत असते. सुमारे दहा वर्षांपूर्वी सरकारने गरजू विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉपचे वाटप केले होते. त्यानंतर संपूर्ण राज्यातील शाळांमध्ये स्मार्ट बोर्ड इन्स्टॉल केले होते. विद्यार्थ्यांना दिले जाणारे डेटा कार्ड इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ तमिळनाडू लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून दिले जाणार आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3shwxnM
via IFTTT

Post a Comment

0 Comments