दहावी उत्तीर्णांसाठी मेट्रो रेल्वे भरती: अर्जांसाठी मुदतवाढ

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये टेक्निशिअन पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार ३१ जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन () मध्ये तंत्रज्ञ, अभियंता यांच्यासह अनेक पदांसाठी ही भरती होत आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. mahametro.org या अधिकृत वेबसाइटवर जाऊन उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या सर्व पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा व मुलाखतीच्या आधारे केली जाईल. पदांची माहिती १) तंत्रज्ञ - (इलेक्ट्रिकल, फिटर, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, रेफ्रिजरेशन) २) स्टेशन कंट्रोलर ३) विभाग अभियंता (सेक्शन इंजिनीअर) ही पदं नॉन सुपरवायझरी ऑपरेशन आणि मेंटेनन्स, पुणे मेट्रो रेल प्रोजेक्टच्या अंतर्गत नियमित पद्धतीवर भरण्यात येणार आहे. पात्रता टेक्निशियनसाठी दहावी पाससाठी अर्ज करू शकतात. या उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये NCVT / SCVT मान्यताप्राप्त संस्थेकडून ITI प्रमाणपत्र मिळवलेले असावे, तर स्टेशन कंट्रोलर व कनिष्ठ अभियंता पदासाठी अर्ज करण्यासाठी एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेकडून अभियांत्रिकी संबंधित ट्रेडमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, सेक्शन इंजिनीअर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित शाखेत बीई किंवा बीटेक असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) मधील तंत्रज्ञ, अभियंता यासह सर्व पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि जास्तीत जास्त वय २८ वर्षे असावे. अर्ज शुल्क या सर्व पदांवर अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना ४०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल, तर इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. वेतन तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल, फिटर, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, रेफ्रिजरेशन) - दरमहा २०,००० ते ६०,००० रुपये स्टेशन कंट्रोलर - दरमहा ३३ हजार ते १ लाख रुपये. विभाग अभियंता (सेक्शन इंजिनीअर) - दरमहा वेतन ४० हजार ते १.२५ लाख रुपये


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3iVTLLy
via IFTTT

Post a Comment

0 Comments