दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार शैक्षणिक मार्गदर्शन

SSC HSC Exam 2021: दहावी, बारावीच्या परीक्षा एप्रिलमध्ये सुरू होत आहेत. यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात आले. त्यामुळे त्यांना परीक्षेमध्ये कोणतीही अडचण येऊ नये व त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यभरात तब्बल ४२६ तज्ज्ञ समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक ८३ समुपदेशकांची नियुक्ती केली असून, त्याखालोखाल पुणे ४६, ठाणे ३०, कोल्हापूर २६, रत्नागिरी २५, सातारा २०, नाशिक १८, अहमदनगर १३, रायगड १२, औरंगाबाद १२, अमरावती ११, नागपूर ८ असे सर्व जिल्ह्यांमध्ये समुपदेशक नेमले आहेत. या समुपदेशकांची जिल्हानिहाय यादी, त्यांचे मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2MAJCYY
via IFTTT

Post a Comment

0 Comments