Also visit www.atgnews.com
प्रजासत्ताक दिनी सन्मानित होणार 'हे' छोटे शूरवीर
Rashtriya Bal Shaurya Puraskar 2021: खेळण्या-बागडण्याच्या वयात या चिमुकल्या मुलांनी मोठ्यांना लाजवेल अशी कामगिरी केली आहे. या मुलांच्या या धाडसाचं कौतुक मंगळवारी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात केलं जाणार आहे. हे 'राष्ट्रीय बाल पुरस्कार' देऊन एकूण ३२ मुलांचा सन्मान केला जाणार आहे. या मुलांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे हे पुरस्कार दिले जाणार आहेत. कोण आहेत हे छोटे वीर... जाणून घेऊ.कामेश्वर जगन्नाथ वाघमारे: दोन मुलांना बुडताना वाचवलंमहाराष्ट्रातल्या कामेश्वर जगन्नाथ वाघमारे या मुलाचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. नदीत बुडणाऱ्या त्याछ्या इतक्यात लहान मुलांसाठी कामेश्वर देवदून बनून आला. कंधार तालुक्यातल्या घोडा गावातल्या नदीत तीन मुले अंघोळीसाठी गेली आणि नदीच्या पात्रात वाहू लागली. तेथून कामेश्वर जात होता. त्याने त्या बुडणाऱ्या मुलांना पाहताच स्वत:च्या जीवाची पर्वा न करताच नदीत उडी घेतली आणि मुलांना वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न केले. दोन मुलांना तो वाचवू शकला परंतु तिसऱ्या मुलाचा प्राण गेला. याची खंत कामेश्वरला आजही आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कामेश्वरचा सन्मान केला आहे.कुंवर दिव्यांश सिंह: स्वत:चा जीव धोक्यात घालून बहिणीला वाचवलेउत्तर प्रदेशातील बाराबंकीत राहणाऱ्या कुंवर दिव्यांस सिंह या मुलाचं वय अवघं १३ वर्षं आहे. पण त्याची कामगिरी ऐकून थक्क व्हायला होते. एके दिवशी तो शाळेतून घरी येत होता. सोबत लहान बहिण आणि आणखी काही मुलं होती. एका बैलाने त्यांच्यावर हल्ला केला. त्याची बहिण बैलाच्या तावडीत सापडतेय म्हटल्यावर दिव्यांशने आपल्या दप्तराचा ढालीसारखा वापर करत बैलाशी भिडला. अखेरीस बैलाला पळवण्यात तो यशस्वी झाला. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला राज्यात तसेच राष्ट्रीय स्तरावर देखील अनेक पुरस्कार मिळाले. दिव्यांशचा प्रजासत्ताक दिनी शौर्य पुरस्काराने सन्मान होणार आहे.ज्योती कुमारी: आजारी पित्याला सायकलवर बसवून केला १२०० कि.मी.चा प्रवासकरोना महामारी काळात जेव्हा संपूर्ण देशात लॉकडाऊन पुकारण्यात आला तेव्हा हजारो मजुरांनी उपाशी मरण्यापेक्षा स्वत:च्या गावचा रस्ता धरला होता. या मजुरांमध्ये ज्योती कुमारीचे वडीलही होते. त्यावेळी ज्योती गुरुग्राममध्ये राहात होती. तिथे पोटापाण्याची काही सोय झाली नाही, उपासमार झाली. तिचे वडील आजारी होते. ज्योतीने हिंमत दाखवली आणि एक सेकंडहँड सायकल घेऊन पित्याला मागे बसवले आणि पेडल मारायला सुरुवात केली. बिहारच्या दरभंगा जिल्ह्यापर्यंत तिला जायचे होते. ज्योती सतत सात दिवस सायकल चालवत होती. मध्ये आराम करत होती. सुमारे १२०० कि.मी.चा हा प्रवास पूर्ण झाला तेव्हा ज्योती संपूर्ण देशातल्या मीडियाचं आकर्षण बनली होती. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांकाने देखील ज्योतीचं कौतुक केलं होतं.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3paS6nT
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments