Also visit www.atgnews.com
राज्यात ८७ टक्के शाळा सुरू; विद्यार्थी उपस्थिती मात्र कमीच
म. टा. प्रतिनिधी, पुणे करोनाचा प्रादुर्भाव ओसरू लागल्यानंतर, आता राज्यातील नववी ते बारावीच्या ८७.९ टक्के सुरू झाल्या आहेत. मात्र, दररोज शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची उपस्थिती २७.८ टक्केच असल्याचे शालेय शिक्षण विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. पुणे शहरात मंगळवारी एकूण १७० शाळा सुरू झाल्या असून, त्यामध्ये १२६ खासगी व अनुदानित शाळा होत्या. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाणही वाढत आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. या निर्णयाचा फायदा ऑनलाइन शिक्षणाच्या सोयीसुविधा नसणाऱ्या, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना झाला. शाळा सुरू करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर सोपवण्यात आली आहे. करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुणे, मुंबई, ठाणे, वर्धा, जळगाव अशा काही जिल्ह्यांतील शाळा सुरू करण्यात आल्या नाहीत. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई आणि ठाणे वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांतील नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्याला प्रतिसाद वाढत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. राज्यात नववी ते बारावीच्या २२ हजार २०४ शाळांमध्ये ५६ लाख ४८ हजार २८ विद्यार्थी आहेत. शालेय शिक्षण विभागाने चार जानेवारीला संकलित केलेल्या माहितीनुसार १९ हजार ५२४ शाळा सुरू झाल्या आहेत. या शाळांमध्ये १५ लाख ७० हजार ८०७ विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंद सोमवारी करण्यात आली. त्यामुळे सोमवारपर्यंत सुरू झालेल्या शाळांचे प्रमाण ८७.९ टक्के असून, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण २७.८ टक्केच असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली. जळगावमध्ये सर्व शाळा सुरू राज्यातील जिल्हानिहाय आकडेवारीचा आढावा घेतल्यास जळगावमधील १०० टक्के शाळा सुरू झाल्या आहेत. अनेक जिल्ह्यांत ८५ टक्क्यांहून अधिक शाळा सुरू झाल्या आहेत. त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक ६४ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. जळगाव, यवतमाळ, लातूर अशा काही जिल्ह्यांमध्ये उपस्थिती ५० टक्क्यांपुढे गेली आहे. मुंबईत अजूनही शाळा सुरू करण्यात आलेल्या नाहीत. पुणे जिल्ह्यात उपस्थिती अल्प पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळांपाठोपाठ आता शहरातील शाळाही हळूहळू सुरू होत आहेत. पुणे महापालिका क्षेत्रातील महापालिकेच्या ४४; तसेच अनुदानित व खासगी अशा १४४ शाळा सुरक्षित अंतराचे नियम पाळून सुरू झाल्या. त्याचप्रमाणे आज, बुधवारी २६० शाळा सुरू करण्यास परवानगी मिळाल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. खासगी इंग्रजी माध्यामांच्या शाळादेखील सुरू होत आहेत. शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे तापमान मोजण्यासाठी थर्मल गन, हात धुण्यासाठी साबण; तसेच सॅनिटायझर, मास्क उपलब्ध करून देण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील २०६८ शाळांपैकी सोमवारपर्यंत ९२७ शाळा सुरू झाल्या. या शाळांमध्ये ८२ हजार ४७७ विद्यार्थी उपस्थित होते. शाळा सुरू होण्याचे प्रमाण ४४.८ टक्के असून, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण ६.९ टक्के इतके आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pPrCbx
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments