मध्य रेल्वेत वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे भरती

Central Railway Recruitment 2021: रेल्वेत नोकरी मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी नामी संधी आहे. सेंट्रल रेल्वेच्या भायखळा डिव्हिजनमध्ये सिनीयर रेसिडेंट पदावर भरती सुरू आहे. वॉक इन इंटरव्ह्यू पद्धतीने उमेदवारांना थेट भरतीसाठी मुलाखत द्यायची आहे. इच्छुक उमेदवार ६ जानेवारी २०२१ रोजी थेट वॉक-इन-इंटरव्ह्यूसाठी उपस्शित राहू शकतात. Central Railway Recruitment 2021: रिक्त पदांबाबतची अधिक माहिती ईएनटी ENT - १ पद जनरल सर्जरी - १ पद गायनॅकोलॉजिस्ट अँड ऑब्सटेट्रिशियन - १ पद ऑप्थल्मोलॉजी - १ पद जनरल मेडिसिन - १ पद शैक्षणिक पात्रता अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी / पदव्युत्तर पदवीधारक असावेत. एमडी / डीएनबी / एमएस / डीएनबी किंवा डिप्लोमा किंवा डिग्री असावी. वयोमर्यादा मध्य रेल्वे भरती २०२१ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय ४० वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गांसाठी नियमानुसार सवलत मिळेल. इच्छुक उमेदवारांनी ६ जानेवारी २०२१ रोजी आपल्या आवश्यक कागदपत्र, प्रमाणपत्रांसह डॉ. बी.ए.एम हॉस्पिटलमध्ये मेडिकल डायरेक्टर कार्यालय, , भायखळा (पूर्व) - मुंबई २७ येथे होणाऱ्या वॉक इन इंटरव्ह्यूमध्ये सहभागी व्हावे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/391qyKK
via IFTTT

Post a Comment

0 Comments