Also visit www.atgnews.com
मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) मध्ये भरती; १.२५ लाखांपर्यंत पगार
Maharashtra Metro Rail Jobs 2021: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन () मध्ये तंत्रज्ञ, अभियंता यांच्यासह अनेक पदांसाठी भरती आहे. महाराष्ट्र मेट्रोमध्ये या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. ज्यामध्ये विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रताही ठरविण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार mahametro.org या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ जानेवारी २०२१ आहे. पुणे मेट्रो रेल प्रकल्प: पुणे रेल्वे प्रकल्पांतर्गत विविध पदांवर भरतीसाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता विहित केल्या आहेत. ज्यामध्ये पदवीधरांना दहावी उत्तीर्णांपासून पदवीधरांपर्यंत अर्ज करण्याची संधी आहे. टेक्निशियनसाठी दहावी पाससाठी अर्ज करू शकतात. या उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये NCVT / SCVT मान्यताप्राप्त संस्थेकडून ITI प्रमाणपत्र मिळवलेले असावे, तर स्टेशन कंट्रोलर व कनिष्ठ अभियंता पदासाठी अर्ज करण्यासाठी एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेकडून अभियांत्रिकी संबंधित ट्रेडमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, सेक्शन इंजिनीअर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित शाखेत बीई किंवा बीटेक असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) मधील तंत्रज्ञ, अभियंता यासह सर्व पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि जास्तीत जास्त वय २८ वर्षे असावे. अर्ज शुल्क या सर्व पदांवर अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना ४०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल, तर इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. हेही वाचा: वेतन तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल, फिटर, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, रेफ्रिजरेशन) पदांवर दरमहा २०,००० ते ६०,००० पगार मिळेल, तर स्टेशन कंट्रोलरच्या पदासाठी दरमहा ३३ हजार ते १ लाख पगार मिळेल. याशिवाय विभाग अभियंता (सेक्शन इंजिनीअर) पदासाठी दरमहा वेतन ४० हजार ते १.२५ लाख रुपये असेल. हेही वाचा: निवड कशी होईल? या सर्व पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा व मुलाखतीच्या आधारे केली जाईल. हेही वाचा: अर्ज कसा करावा? इच्छुक आणि पात्र उमेदवार महाराष्ट्र मेट्रोच्या अधिकृत वेबसाइट mahametro.org च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ जानेवारी २०२१ आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2L0YCyA
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments