SSC HSC Exam: दहावी, बारावी परीक्षांच्या तारखांची घोषणा या आठवड्यात

SSC HSC Exam Dates Update: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ () इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा (Exam timetable) या आठवड्यात जाहीर करणार आहे. बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना ही माहिती दिली. दहावीची परीक्षा मे महिन्यात तर बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर आयोजत करण्यात टेणार असल्याचे पाटील यांनी सोमवारी सांगितले. यापूर्वी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल-मे महिन्यात घेण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. बोर्डाच्या अध्यक्ष शकुंतला काळे निवृत्त झाल्याने दिनकर पाटील यांच्यावर राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे. 'आम्ही परीक्षांच्या तारखा या आठवड्यात जाहीर करू. विद्यार्थी, शिक्षक, पालकांना परीक्षांच्या तारखा पुरेशा वेळेआधी माहित असल्या तर त्यांना तयारीसाठी पूर्ण वेळ मिळेल,' असं पाटील म्हणाले. दहावी-बारावी परीक्षा सर्वसाधारणपणे फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेतल्या जातात. पण यावर्षी कोविड-१९ महामारी स्थितीमुळे त्या विलंबाने घेण्यात येणार आहेत. परीक्षा ४० ते ४५ दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. हेही वाचा: पाटील म्हणाले, 'बोर्डाने नुकतेच पुरवणी परीक्षांचे आयोजन केले होते. सुमारे दोन लाखांवर विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. परीक्षा सुरळीत पार पडली. दोन आठवड्यात निकाल जाहीर झाला. विद्यार्थ्यांना कोणतीही समस्या जाणवली नाही. याच पद्धतीने संपूर्ण सुरक्षा, खबरदारीसह नियमित परीक्षाही आम्ही आयोजित करू असा आम्हाला विश्वास आहे.' दरम्यान, दहावीचे परीक्षा अर्ज भरण्याची मुदत २१ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/39lyrLn
via IFTTT

Post a Comment

0 Comments