Also visit www.atgnews.com
IBPS RRB Result 2020: ऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर
RRB Prelims Result 2020:इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग पर्सनल सिलेक्शनने आरआरबी ऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. ११ जानेवारी रोजी आरआरबी प्रिलिम्स २०२० च्या निकालाची घोषणा झाली. ज्या उमेदवारांना हा निकाल पाहायचा असेल त्यांनी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाला ibps.in ला भेट द्यावी. आयबीपीएसद्वारे जारी केलेल्या अपडेटनुसार आरआरबी ऑनलाइन प्रिलिम्स परीक्षा २०२० चा निकाल संस्थेच्या वेबसाइटवर १८ जानेवारी २०२१ पर्यंत उपलब्ध असेल. इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग पर्सनल सिलेक्शनद्वारे देशभरात विविध प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये ऑफिसर स्केल १ पदांच्या भरती प्रक्रियेअंतर्गत ही पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचे आयोजन १२ आणि १३ सप्टेंबर २०२० रोजी करण्यात आले होते. मुख्य परीक्षा ३० जानेवारीला जे उमेदवार आयबीपीएस आरआरबी ऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेच्या निकालात यशस्वी ठरले आहेत, ते पुढील टप्प्यात मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. आयबीपीएस आरआरबी ऑफिसर स्केल १ मुख्य परीक्षा २०२१चे आयोजन ३० जानेवारी रोजी केले जाणार आहे. असा पाहा आयबीपीएस आरआरबी ऑफिसर स्केल १ पू्र्व परीक्षेचा निकाल - संस्थेचे अधिकृत संकेतस्थळ ibps.in वर जा. - यानंतर आरआरबी आणि नंतर CRP-RRBs-IX शी संबंधित पर्यायावर क्लिक करा. - नंतर नव्या पेजवर रिझल्ट लिंक क्लिक करा. - आपला रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख भरून सबमीट करा. - आता तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. - निकाल डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंटही घेऊन ठेवा. दरम्यान, उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की आयबीपीएसद्वारे ऑफिसर स्केल १ प्रिलीम्स परीक्षेचे केवळ स्टेटस जारी केले आहेत. स्कोअर कार्ड नंतर जाहीर करण्यात येणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3sfQxHa
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments