रिझर्व्ह बँकेत नोकऱ्यांचा पाऊस! आणखी एक भरती प्रक्रिया

Recruitment 2021: भारतीय रिझर्व्ह बँकेत (आरबीआय) नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी सध्या सुवर्णकाळ सुरू आहे. बँकेत ज्युनिअर इंजिनीअर, ग्रेड बी ऑफिसर, सिक्युरिटी गार्ड पदांवर भरती प्रक्रिया सुरू असतानाच नोकरभरतीची एक आणखी जाहिरात आली आहे. १० फेब्रुवारी रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. लीगल ऑफिसर (ग्रेड बी), मॅनेजर (टेक-सिव्हिल), असिस्टंट मॅनेजर (राजभाषा) आणि असिस्टंट मॅनेजर (प्रोटोकॉल आणि सिक्युरिटी) या पदांवर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवार बँकेचे अधिकृत संकेतस्थळ rbi.org.in वर उपलब्ध करण्यात आलेल्या ऑनलाइन अर्जाच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. उमेदवार १० मार्च २०२१ पर्यंत आपला अर्ज सादर करू शकतात. पदांची नावे लीगल ऑफिसर (ग्रेड बी) - ११ पदे मॅनेजर (टेक-सिव्हिल) - १ पद असिस्टंट मॅनेजर (राजभाषा) १२ पदे असिस्टंट मॅनेजर (प्रोटोकॉल आणि सिक्युरिटी) - ५ पदे एकूण पदे - २९ हेही वाचा: अर्ज कसा करायचा? आरबीआयच्या संकेतस्थळावर गेल्यानंतर करिअर सेक्शनवर जावे. यानंतर २३ फेब्रुवारी या तारखेसह उपलब्थ करण्यात आलेल्या अप्लाय ऑनलाइन लिंकवर क्लिक करावे. यानंतर नव्या पेजवर विचारलेली माहिती भरून नोंदणी करावी. यानंतर रजिस्ट्रेशन क्रमांक किंवा यूजर नेम आणि पासवर्डसह लॉगइन करून अॅप्लिकेशन सबमिट करावे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Oefbs7
via IFTTT

Post a Comment

0 Comments