Also visit www.atgnews.com
राज्यात १५ फेब्रुवारीपासून ५० टक्के उपस्थितीने कॉलेज होणार सुरू
College Reopening: शाळांनंतर आता महाविद्यालयेही सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील १५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. सुरुवातीला ५० टक्के उपस्थितीत ही महाविद्यालये सुरू होणार आहेत. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्यातील महाविद्यालये करोना महामारी काळात ऑनलाइन पद्धतीने सुरू होती. मात्र आता करोना संसर्गाचा जोर ओसरत असताना राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कॉलेजे कशा पद्धतीने सुरू केली जावीत त्या संदर्भातील निर्णय स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने विद्यापीठांनी घ्यावयाचा आहे. दरम्यान, करोना महामारी पार्श्वभूमीवर तूर्त तरी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील ७५ टक्के उपस्थितीची अट रद्द करण्यात आली आहे. सध्या केवळ ५० टक्के उपस्थितीने महाविद्यालये सुरू होणार असली तरी ५ मार्चनंतर १०० टक्के सुरू करण्याचा विचार असल्याचेही सामंत यांनी सांगितले. वसतिगृहे सध्या बंदच राहतील महाविद्यालये सुरू होणार असली तरी वसतिगृहे मात्र सध्या बंदच राहणार आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील वसतिगृहे की करोना संशयित रुग्णांसाठी क्वारंटाइन सेंटर म्हणून कार्यरत आहेत, त्यामुळे त्या वसतिगृहांना कोणत्याही प्रकारे धक्का लावता येणार नाही. म्हणूनच तूर्त वसतिगृहे बंद राहतील अशी माहिती सामंत यांनी दिली.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36DSTXg
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments