Also visit www.atgnews.com
CBSE परीक्षा प्रथमच होणार दोन सत्रात
Exams 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने आगामी बोर्ड परीक्षांसाठी इयत्ता दहावी, बारावीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. करोना महामारीनंतर यंदा प्रथमच होणाऱ्या या परीक्षा पहिल्यांदाच दोन सत्रांत आयोजित केल्या जाणार आहेत. पहिलं सत्र सकाळी १०.३० ते दुपारी १.३० पर्यंत तर दुसरं सत्र दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत असणार आहे. सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ४ मे २०२१ पासून सुरू होणार आहेत. परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक बोर्डाने मंगळवारी जाहीर केले. इयत्ता बारावीच्या परीक्षा दोन सत्रात होणार आहेत, तर दहावीची परीक्षा ६ मे २०२१ पासून सुरू होणार असून एकाच सत्रात होणार आहे. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेच्या आकलनासाठी १५ मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात येणार आहे. यावेळी नियमित परीक्षेच्या दिशानिर्देशांव्यतिरिक्त CBSE ने कोविड-१९ गाइडलाइन्स देखील जारी केल्या आहेत. यानुसार परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना मास्क घालणे अनिवार्य असेल. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी हेही सांगितले की परीक्षा केंद्रे अशाप्रकारे अलॉट केली जातील की ज्यामुळे एका ठिकाणी गर्दी होणार नाही. CBSE Class 12 Exams: या गोष्टींकडे द्या लक्ष - - परीक्षा लवकर संपवण्यासाठी सीबीएसई बारावीच्या परीक्षा दोन सत्रात आयोजित केल्या जाणार आहेत. - दुसऱ्या सत्रात केवळा चार पेपरची परीक्षा होणार आहे. - बारावीची परीक्षा एकूण ११४ विषयांसाठी आयोजित केली जाईल. CBSE Class 10 Exams: दहावी परीक्षेसाठी या नियमांकडे द्या लक्ष - - एकूण ७५ विषयांसाठी इयत्ता दहावीची परीक्षा आयोजित केली जाईल. - बहुतांश परीक्षा तीन तासांसाठी आयोजित केली जाईल. पण पेंटिंग, कर्नाटक संगीत आणि हिंदुस्थानी संगीत आदी विषयांसाठी दोन तासांचा वेळ १०.३० ते १२.३० असा असेल. - ताणविरहित पद्धतीने विद्यार्थ्यांना परीक्षा देता यावी म्हणू्न बोर्डाने दोन परीक्षांच्या मध्ये अवधी दिला आहे. हेही वाचा:
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/39Nxddn
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments