Also visit www.atgnews.com
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचे नाव बदलणार; आता 'हे' नाव निश्चित
मुंबईः मुंबई महापालिकेचा २०२१- २०२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज महापालिकेत सादर करण्यात आला आहे. शिक्षण विभागासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात २९, ४५, ७८ कोटींची तरतूद केली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्पात यंदा १. १९ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. महापालिकेच्या शाळांचे नाव बदलण्याचा मोठा निर्णय यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. पालिकेचे सहआयुक्त रमेश पवार यांनी शिक्षण समितीच्या अध्यक्षा श्रीमती संध्या दोशी यांच्याकडे शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प आज महानगरपालिका सभागृहात सादर केला. पालिकेच्या शाळांचे नामांतर 'मुंबई पब्लिक स्कुल' असे करण्यात येणार आहे. महानगर पालिकेच्या शाळांबद्दल जनतेच्या मनात सकारात्मक दृष्टीकोन निर्माण व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्राथमिक विभागाच्या ९६३ आणि माध्यमिक विभागाच्या २२४ मनपा शाळांच्या मूळ नावासह मुंबई पब्लिक स्कुल (M.P.S) असं नामांतर करण्यात येणार आहे. त्यासाठी MPSसाठी नवा लोगोही तयार करण्यात आला आहे. करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना. ऑनलाइन शाळांवर अधिक भर देण्यात आला. त्यामुळं या वर्षीच्या अर्थसंकल्पात याबाबत गांभीर्यानं विचार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना व्हॉट्सअॅप आणि चॅट बोटच्या माध्यमातून करिअर काऊन्सिलिंग साठी २१.१० लाख रुपयांची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तसंच, शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठीही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शाळांसाठी सॅनिटायझर, ऑक्सिमीटर, थर्मल सकॅर यासाठी १५.९० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शिक्षण विभाग अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्ये > पुढील वर्षात १० नवीन सीबीएसई शाळा सुरू करणार > बालवाडी सक्षमीकरण साठी स्वयंसेवी संस्थांशी करार > २४ शाळांमध्ये दहावीपर्यंत शिक्षण सुविधा वाढविणार > २७९ मराठी माध्यमाच्या बालवाडी वर्गांमध्ये ६ महिन्याच्या कालावधीसाठी रॉकेट लर्निंग व आकांक्षा फाऊंडेशन या एनजीओमार्फत प्रशिक्षण प्रकल्प राबविण्यात येणार >> २४ शाळांमध्ये संगीत केंद्र सुरू करणार
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pISHgZ
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments