मुंबई विद्यापीठ आयडॉलच्या जानेवारी सत्र प्रवेशांसाठी पुन्हा मुदतवाढ

IDOL 2021: मुंबई विद्यापीठाच्या () दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (IDOL) जानेवारी सत्राच्या (January Semester) प्रवेश प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी १७ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. जानेवारी सत्राचे प्रवेश १९ जानेवारीपासून सुरू झाले असून, आजपर्यंत जानेवारी सत्रात २,५७७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. बारावी पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या जानेवारी सत्रात बीए किंवा बीकॉमच्या प्रथम वर्षात प्रवेश घेता येईल. विद्यापीठ अनुदान आयोगाने वर्ष २०२० मध्ये मुंबई विद्यापीठास जानेवारी सत्राच्या प्रवेशास मान्यता देण्यात आली होती. यानुसार २०२० च्या जानेवारी सत्रात प्रथमच ९०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. २०२१ च्या जानेवारी सत्राचे प्रवेश सुरू असून, १७ फेब्रुवारीपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या https://ift.tt/34WfOvj या वेबसाइटवरून प्रवेश घ्यावा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qcl0Ey
via IFTTT

Post a Comment

0 Comments