Also visit www.atgnews.com
भारतीय नौदलात नाविक पदांवर भरती
Indian Navy Recruitment 2021: तुम्ही क्रीडापटू आहात आणि तुम्हाला देशसेवा करायची आहे तर तुमच्यासाठी एक नामी संधी चालून आली आहे. भारतीय नौदलात क्रीडा कोट्यात विविध पदांवर भरती होणार आहे. या भरतीची जाहिरात देखील प्रसिद्ध झाली आहे. नौदलातील खलाशी पदांवरील या भरतीसंदर्भातल्या अधिसूचनेनुसार, इच्छुक आणि योग्य उमेदवार या प्रक्रियेद्वारे अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया ऑफलाइन आहे. ७ मार्च २०२१ पर्यंत अर्ज करता येतील. मात्र, ईशान्येतील राज्ये, जम्मू-काश्मीर, अंदमान-निकोबार, लक्षद्वीप येथे अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ मार्च २०२१ आहे. पात्रता काय? नेव्ही सेलर्स स्पोर्ट्स कोटा एन्ट्री (01/2021) बॅच अधिसूचनेनुसार डायरेक्ट इंट्री पेटी ऑफिसर (डीईपीओ), सीनियर सेकेंडरी रिक्रूट (एसएसआर) आणि मॅट्रिक रिक्रूट (एमआर) कॅटेगरी मध्ये नौसैनिकांची भरती केली जाणार आहे. तीनही कॅटेगरी साठी पात्रता वेगवेगळी आहे. सीनिअर सेकेंडरी रिक्रूट (MMR) - या पदांवरील भरतीसाठी उमेदवारांना कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. वयोमर्यादा १७ ते २१ वर्षे आहे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म १ फेब्रुवारी २००० पूर्वीचा आणि ३१ जानेवारी २००४ नंतरचा नसावा. मॅट्रिक रिक्रूट (MR) - या पदांसाठी उमेदवारांना दहावी उतीर्ण होणे अनिवार्य आहे. वयोमर्यादा १७ ते २१ वर्षे आहे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म १ फेब्रुवारी २००० नंतरचा किंवा ३१ जानेवारी २००४ पूर्वीचा असावा. वरील सर्व योग्यतेशिवाय उमेदवारांना खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय किंवा राज्यस्तरावरील स्पर्धेत भाग घेतलेला असणे आवश्यक आहे. किंवा आंतरविद्यापीठ स्पर्धेत विद्यापीठाकडून सहभाग घेतलेला असावा.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3aYzxNK
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments