Also visit www.atgnews.com
दहावी, बारावी परीक्षा: दिव्यांगांसाठी लेखनिक व्हा; नोंदणीसाठी बोर्डाची बँक
दहावी आणि बारावीच्या अंतिम बोर्ड परीक्षांसाठी ज्या दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखनिकाची आवश्यकता आहे आणि दुसरीकडे ज्यांना लेखनिक म्हणून सेवा देण्याची इच्छा आहे, अशा दोहोंसाठी बोर्डाने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ज्यांना रीडर किंवा रायटर व्हायची इच्छा आहे त्यांनी बोर्डाकडे ३१ मार्चपर्यंत नोंदणी करायची आहे. यासंदर्भातील सूचना बोर्डाने जारी केली आहे. यानुसार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर एक लिंक दिली आहे. या लिंकवर जाऊन इच्छुकांनी नोंदणी करायची आहे. या सूचनेत असे म्हटले आहे की, शासन निर्णयानुसार, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने लेखनिक / वाचक बँक तयार करण्यासाठी https://ift.tt/3q60ip7 ही लिंक उपलब्ध करून दिली आहे. यात नावनोंदणी करण्यासाठी ३१ मार्च २०२१ पर्यंतची मुदत दिली आहे. विशेष हेल्पलाइन सेवा या सूचनेत असं म्हटलंय की, 'दहावी, बारावी परीक्षेत विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विभागीय स्तरावर लेखनिक व वाचक उपलब्धतेबाबत येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. संबंधित विभागीय मंडळाचे सहसचिव किंवा सहाय्यक सचिव संबंधितांना हेल्पलाइनद्वारे मार्गदर्शन करणार आहेत.' विभागनिहाय हेल्पलाइन क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत - पुणे - सहसचिव - प्रिया शिंदे - ९६८९१९२८९९ सहाय्यक सचिव - संगिता शिंदे - ८८८८३३९५३० नागपूर - सहसचिव - माधुरी सावरकर - ९४०३६१४१४२ सहाय्यक सचिव - व्ही. एच. जोग - ९८९०५१४८३९ मुंबई - सहसचिव - मुश्ताक शेख - ७०२००१४७१४ सहाय्यक सचिव - गिरीधर भोज - ७०५८५९५६६४ औरंगाबाद - सहसचिव - राजेंद्र पाटील - ९९२२९००८२५ सहाय्यक सचिव - एन. वाय. बनसोडे - ९४२१३३६८०१ अमरावती - सहाय्यक सचिव - जयश्री राऊत - ९९६०९०९३४७ कोल्हापूर - सहसचिव - देविदास कुलाळ - ७५८८६३६३०१ सहाय्यक सचिव - सुवर्णा सावंत - ८००७५९७०७१ नाशिक - सहाय्यक सचिव - एम. यू. देवकर - ८८८८३३९४२३ / ७७५५९०३४२७ लातूर - सहाय्यक सचिव - संजय पंचगल्ले - ९४२१६९४२४८ कोकण - सहसचिव - भावना राजनोर - ८८०६५१२२८८
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kx0EE5
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments