Also visit www.atgnews.com
मुंबई विद्यापीठ आयडॉलच्या बीएसस्सी आयटीला परवानगी नाकारली
म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त शिक्षण संस्था, अर्थात आयडॉलमध्ये शिकविण्यात येणाऱ्या बीएसस्सी आयटी या अभ्यासक्रमाच्या जानेवारी सत्रासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने परवानगी मागवली आहे. यामुळे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलमध्ये ‘बीएसस्सी आयटी’ अभ्यासक्रम चालविला जातो. या अभ्यासक्रमासाठी येथे मोठ्या प्रमाणावर मागणी असते. या अभ्यासक्रमाच्या एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या शैक्षणिक वर्षासाठी आयोगाने मान्यता दिली आहे. मात्र आयडॉलच्या जानेवारी ते डिसेंबर सत्रासाठी ही मान्यता नाकारली आहे. आयडॉलकडे हा अभ्यासक्रम शिकविण्यासाठी पुरेसे शिक्षक नसल्याचे कारण देत आयोगाने ही परवानगी नाकारली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील सर्व विद्यापीठांमध्ये मुक्त अध्ययन संस्थेत सुरू असलेल्या बीएसस्सी आयटी आणि एमएस्सी कम्प्युटर सायन्स या दोन विषयांच्या अभ्यासक्रमांबाबत चौकशी करण्यात आली होती. याचे संबंधित अहवाल सादर करण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. आयोगाच्या नियमांनुसार या संस्थांमध्ये हे अभ्यासक्रम शिकविण्यासाठी तीन प्राध्यापकांची आवश्यकता असते. मुंबई विद्यापीठात एक प्राध्यापक हे कम्प्युटर सायन्स अभ्यासक्रम शिकविणारे आहेत. यामुळे सध्या आयटीसाठी दोनच प्राध्यापक असल्याचे सांगत आयोगाने ही परवानगी नाकारली. यामुळे विद्यापीठाच्या या अभ्यासक्रमांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, या अभ्यासक्रमासाठी आवश्यक परवानगी आणि क्षमता संस्थेकडे आहेत. आयोगाने प्राध्यापकांच्या नियुक्तीबाबत जी शंका उपस्थित केली आहे त्याबाबात आयोगाला स्पष्टीकरण देण्यात येणार असून लवकरच आम्हाला मान्यता मिळू शकेल असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2NN3rwZ
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments