Also visit www.atgnews.com
सैनिकी शाळांत मिळणार मुलींना प्रवेश
मुंबई : लष्करी दलांना प्रमुखांसह सर्वोत्तम उच्चाधिकारी देणाऱ्या शासकीय सैनिकी शाळांमध्ये मुलींना प्रवेश देण्यास मागील वर्षीच सुरुवात झाली. पण त्यामध्ये पहिल्या टप्प्यात फक्त सात शाळांचा समावेश होता. आगामी शैक्षणिक सत्रापासून देशातील सर्व म्हणजे ३३ सैनिकी शाळांत मुलींना प्रवेश दिला जाणार आहे. याचा 'आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज' अर्थात एएफएमसीसारख्या अकादमीतील निवडीसाठी या मुलींना चांगला फायदा होईल. राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) किंवा नेव्हल अकादमीला (एनए) अधिकाधिक चांगले व दमदार प्रशिक्षणार्थी मिळावे आणि पुढे हे प्रशिक्षणार्थी लष्करातील सर्वोत्तम अधिकारी बनावे, या संकल्पनेतून १९६१ मध्ये मुलांसाठी सैनिकी शाळांची स्थापना झाली. राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशात प्रत्येकी एक, यानुसार या शाळा उभ्या झाल्या. अशा ३३ शाळा सध्या कार्यरत आहेत. महाराष्ट्रात सातारा व दोन वर्षांपूर्वी चंद्रपूरला सुरू झालेली, अशा दोन शाळा आहेत. सातारा सैनिकी शाळेसह देशभरातील सर्व शाळा या एनडीए किंवा एनएला प्रशिक्षणार्थी पुरविणारी खाणच आहेत. आता मागील काही वर्षात लष्करी दलांमध्ये महिला अधिकाऱ्यांचा टक्का वाढावा, यासाठी केंद्र सरकारकडून धोरणात्मक तयारी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता या सैनिकी शाळांमध्ये मुलींनाही प्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या ताज्या निर्णयानुसार, २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता सहावीसाठी मुलींना सैनिकी शाळेत प्रवेशाचा निर्णय घेण्यात आला. परंतु त्यामध्ये फक्त सात शाळांचाच समावेश होता, त्यातील एक चंद्रपूर सैनिक शाळा होती. आता २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून मात्र सर्व ३३ सरकारी सैनिकी शाळेत मुलींना प्रवेश देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. इयत्ता सहाव्या वर्गात प्रवेश परीक्षेद्वारे मुलींची यासाठी निवड होईल. १०० नवीन शाळादेखील संलग्न देशभरातील या सरकारी 'सैनिक स्कूल सोसायटी'अंतर्गत आहेत. सोमवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात आता आणखी १०० शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला. या नव्या १०० शाळा सामाजिक संस्थांमार्फत उभ्या होतील व त्यादेखील याच सोसायटीशी संलग्न होणार असल्याचे संरक्षण खात्याकडून सांगण्यात आले आहे. 'एएफएमसी'साठी प्रवेश असा सैनिकी शाळांचे शिक्षण हे १२व्या वर्गापर्यंतच असते. त्याचवेळी लष्करात अधिकारीपदी प्रवेशासाठी इयत्ता १२ नंतर एनडीए/नेव्हल अकादमी तसेच अन्य काही थेट मुलाखतीवर आधारित संधी असतात. या सर्व संधी सध्या फक्त मुलांनाच आहेत. सैनिकी शाळेतील छात्रसैनिकांची दरवर्षी चांगल्या संख्येने एनडीए किंवा नेव्हल अकादमीत निवड होत असते. याखेरीज लष्करी डॉक्टरांना तयार करण्यासाठी एएफएमसीची परीक्षाही असते. ही परीक्षा सध्या मुले व मुली, असे दोघेही देऊ शकतात. त्यामुळे आता खुला झाल्यानंतर तेथे शिकणाऱ्या मुली स्वत:ला 'एएफएमसी'साठी तयार करू शकतील.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pMQNf9
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments