डिप्लोमा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; ऑनलाइन आणि एमसीक्यू पद्धतीने परीक्षा

म. टा. प्रतिनिधी, पुणे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या (एमएसबीटीई) अखत्यारित येणाऱ्या इंजिनीअरिंग व फार्मसी डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या हिवाळी परीक्षा; तसेच अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमातील नियमित, बॅकलॉग विद्यार्थ्यांची हिवाळी प्रात्यक्षिक परीक्षा, थिअरी परीक्षा बहुपर्यायी (एमसीक्यू) स्वरूपात ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यानुसार डिप्लोमाच्या थिअरी परीक्षा २ ते २३ मार्च, प्रथम सत्र आणि थेट द्वितीय वर्ष इंजिनीअरिंग डिप्लोमा थिअरी परीक्षा २४ ते ३० मार्च, नॉन-एआयसीटीई अभ्यासक्रमांची थेअरी परीक्षा २ ते १२ मार्च दरम्यान होणार आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे सचिव डॉ. महेंद्र चितलांगे यांनी संबंधित परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले. अभ्यासक्रमांच्या थिअरी परीक्षांपूर्वी प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहेत. त्यातील मार्गदर्शक सूचनांनुसार, हिवाळी परीक्षा ऑनलाइन बहुपर्यायी घ्यायच्या आहेत. परीक्षा विद्यार्थ्यांना वास्तव्यास असणाऱ्या ठिकाणावरूनच देता येणार आहे. या परीक्षा सकाळी १० ते १२; तर दुपारी २ ते ४ या दोन संत्रामध्ये होणार असून, प्रत्येक सत्रात परीक्षेसाठी दोन तास वेळ देण्यात येईल. दोन परीक्षेत विद्यार्थ्यांना ४० पैकी ३० प्रश्‍न सोडवावे लागतील. ज्या विद्यार्थ्यांना घरून परीक्षा देणे शक्य नाही. त्यांना जवळच्या पॉलिटेक्निकमध्ये परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाइन प्रणालीचा वापर करून तोंडी पद्धतीने संस्थास्तरावर घेण्यात यावी. यासाठी विविध मीटिंग अ‍ॅप्लिकेशनचा वापर करून प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात यावी. अशा प्रकारे शक्य नसल्यास टेलिफोनिक पद्धतीने प्रात्यक्षिक परीक्षा संस्थास्तरावर घेण्यात यावी. सर्व प्रयत्नानंतरही विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा घेणे शक्य नसल्यास अशा विद्यार्थ्यांचे असाइनमेंट, जर्नल्स, निरंतर मूल्यमापन या आधारावर मूल्यमापन करून गुण द्यावेत. परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्याची जबाबदारी तंत्रशिक्षण संस्थांच्या प्राचार्यांचीच राहणार असल्याचे डॉ. चितलांगे यांनी सांगितले आहे. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3aLmAXw
via IFTTT

Post a Comment

0 Comments