Also visit www.atgnews.com
मुंबई विद्यापीठाच्या एलएलबी सत्र ५ परीक्षेचा निकाल जाहीर
LLB Sem 5 Exam 2021: डिसेंबर २०२० मध्ये संपन्न झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या विधी शाखेचा एलएलबी सत्र ५ या परीक्षेचा निकाल काल जाहीर करण्यात आला असून या परीक्षेचा निकाल ९१.९५ टक्के लागला आहे. या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेत एकूण ४ हजार ७९८ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला ५ हजार ४२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५ हजार ३७५ एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले होते. तर ४७ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच या परीक्षेत ४१९ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेचा निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ https://ift.tt/2eryysJ यावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. हिवाळी सत्राचे आजपर्यंत विद्यापीठाने ७३ निकाल जाहीर केले आहेत. RESULT OF LLB SEM V Registered Students : 5,423 Appeared Students : 5,375 Absent Students : 47 Successful Students : 4,798 Unsuccessful Students: 419 Pass Percentages : 91.95 %
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ufvx4r
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments