CBSE Exam 2021: बोर्डाने जारी केले महत्त्वाचे परिपत्रक

10th 12th Datesheet: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत () २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेसंदर्भात मंडळाने एक परिपत्रक जारी केले आहे. सीबीएसईने बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक, तारीखपत्रक व त्यातील काही इतर सावधगिरीबाबतची माहिती दिली आहे. त्याचा तपशील आणि बोर्डाने जारी केलेल्या परिपत्रकाची लिंक या वृत्तात पुढे देण्यात आली आहे. परिपत्रकात असे म्हटले आहे की सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा मंगळवार, ४ मे २०२१ पासून देशभर सुरू होतील. तर सर्व सीबीएसई बोर्डाशी संलग्न शाळा १ मार्च २०२१ पासून दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा (सीबीएसई प्रॅक्टिकल परीक्षा) घेऊ शकतात. परंतु बोर्डाने लेखी परीक्षा सुरू करण्यापूर्वी शाळांना त्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा, प्रोजेक्ट आणि अंतर्गत मूल्यांकन पूर्ण करावे लागेल. सीबीएसईने म्हटले आहे की दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षा २०२१ चे वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध होईल. २८ जानेवारी रोजी शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी मुख्याध्यापकांना सांगितले होते की बोर्ड ०२ फेब्रुवारी २०२१ रोजी वेळापत्रक जारी करेल. या परिपत्रकामध्ये सीबीएसईने सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि इतर संबंधितांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. मंडळाने म्हटले आहे की परीक्षेसंदर्भात कोणतीही माहिती सीबीएसई वेबसाइट cbse.gov.in वर प्रसिद्ध केली जाईल. कोणत्याही सोशल मीडिया पोस्टवर किंवा कोणत्याही प्रकारच्या फॉरवर्डेड मेसेजवर विश्वास ठेवू नका.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36AP8Sj
via IFTTT

Post a Comment

0 Comments