Also visit www.atgnews.com
५ लाख विद्यार्थी नोंदणी, UGC चे समर्थन; मग का स्थगित झाली गो विज्ञान परीक्षा?
चहूबाजूंनी टीकेचा भडीमार झाल्यामुळे येत्या २५ फेब्रुवारीला होणारी गो विज्ञानावरील परीक्षा अखेर राष्ट्रीय कामधेनू आयोगाने पुढे ढकलली आहे. गो विज्ञान पूर्णपणे अवैज्ञानिक असून, ती अंधश्रद्धा आहे, अशी टीका या परीक्षेवर करण्यात आली होती. परीक्षा रद्द करण्याची मागणी विविध संस्था, संघटनांनी केली होती. भारतात आढळणाऱ्या ५१ देशी गायींविषयी जनजागृती करणे आणि देशी वाणांच्या गायींचे महत्त्व समजावून देणे, हा या परीक्षेमागील हेतू असल्याचे सांगण्यात येत होते. या परीक्षेची रंगीत तालीम रविवारी (२१ फेब्रुवारी ) होणार होती. नियोजित वेळेच्या आधी दोन तास ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. ही परीक्षा रद्द करण्यात आलेली नाही, असे कामधेनू आयोगाचे अध्यक्ष वल्लभभाई कथिरीया यांनी स्पष्ट केले. प्रशासकीय कारणांमुळे तूर्त ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची नवी तारीख लवकरच निश्चित केली जाईल, असे कथिरीया यांनी म्हटले आहे. या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम राष्ट्रीय कामधेनू आयोगाने गेल्या महिन्यातच वेबसाइटवर प्रसिद्ध केला होता. मात्र, त्यामध्ये अवैज्ञानिक, कोणताही आधार नसलेल्या गोष्टी समाविष्ट आहेत, असा आरोप विज्ञानवादी संघटनांनी केला होता. केरळ शास्त्र साहित्य परिषदेसह अनेक संघटनांनी ही परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. कोलकात्यातील जादवपूर विद्यापीठाने देखील या परीक्षेला कडाडून विरोध केला होता. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यानंतर जादवपूर् युनिव्हर्सिटीच्या फेसबुक पेजवर लिहिले होते की, जर पाच लाख विद्यार्थी परीक्षेला बसत आहेत, तर परीक्षेच्या आयोजनाचा पुनर्विचार करावा, जेणेकरून शिक्षण पद्धतीला एक नवी अवैज्ञानिक दिशा मिळेल, असे आवाहन जादवपूर विद्यापीठाने केले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pJSOYI
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments