UPSC परीक्षेसाठी लेहमध्ये नवीन परीक्षा केंद्र सुरू

केंद्रीय लोकसेवा आयोग () २७ जून रोजी नागरी सेवा पूर्व परीक्षा आयोजित करणार आहे. यूपीएससीने लेहमध्ये सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेसाठी नवीन परीक्षा केंद्र सुरू केले आहे. नागरी सेवा परीक्षा २०२१ (CSE 2021) आणि भारतीय वन सेवा परीक्षा (IFoSE 2021) एकाच वेळी घेण्यात येणार आहेत. सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि इतर नागरी सेवांमध्ये उमेदवारांच्या निवडीसाठी दरवर्षी घेतली जाते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाते. कॅलेंडरनुसार नागरी सेवा पूर्व परीक्षा २७ जून २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. पूर्व परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षा व नंतर मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. उमेदवारांना कोर्टाचा दिलासा नाही दरम्यान, ज्या उमेदवारांना २०२० मधली केंद्रीय नागरी सेवा परीक्षा कोविड १९ मुळे देता आली नव्हती, त्या उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिलेला नाही. या याचिकाकर्त्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली. या निर्णयाचा २००० हून अधिक उमेदवारांवर परिणाम होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात काही उमेदवारांनी याचिका दाखल करत मागणी केली होती की २०२० मध्ये सिव्हिल सर्व्हिस परीक्षा देण्याची ज्या उमेदावारांसाठी अंतिम संधी आहे, त्यांना आणखी एक संधी दिली जावी. करोना संक्रमणामुळे उमेदवारांना परीक्षेची नीट तयारी करता आली नव्हती, त्यामुळे ज्या उमेदवारांसाठी २०२० मध्ये अखेरचा अटेम्प्ट होता, त्यांना परीक्षेसाठी आणखी एक संधी दिली जावी, असा युक्तीवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3aOfAKM
via IFTTT

Post a Comment

0 Comments