जेईई मेन २०२१ फेब्रुवारी परीक्षेचा निकाल कधी? जाणून घ्या

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) ने संयुक्त प्रवेश परीक्षेचे पहिले सत्र () २३ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान आयोजित केले होते. या परीक्षेचा निकाल ७ मार्च पर्यंत जाहीर केला जाणार आहे. या सत्रात तीन तासांची परीक्षा ३३१ शहरांमध्ये ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. एनटीएने ८२८ केंद्रांवर ची बीटेक परीक्षा आणि ४३७ परीक्षा केंद्रांवर पेपर २ (BArch आणि BPlanning) परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. जेईई मेन 2021 चा निकाल कधी जाहीर होणार? नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) जेईई मेन 2021 चा निकाल (फेब्रुवारी सत्र) ७ मार्चपर्यंत जाहीर करेल. यावर्षी, एनटीएने मे नंतरच्या महिन्यांत जेईई मेनचे चार सत्रात आयोजन करणार आहे. प्रत्येक सत्रासाठी जेईई मेन 2021 चा निकाल जाहीर झाल्यानंतर एनटीए पुढील फेरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करेल. चारही फेऱ्या संपल्यानंतर एनटीए सर्व सत्राचे निकाल संकलित करेल आणि एकत्रित जेईई कट ऑफ व रँक देईल. एकदा जेईई मेन २०२१1 फेब्रुवारीचा निकाल जाहीर झाल्यानंतर एनटीए जेईई मेन २०२१ मार्चच्या अर्जासाठी विंडो उघडेल. जेईई मेन परीक्षा वर्षातून चार वेळा घेतली जाईल. जेईई मेन 2021: पुढील सत्रांची तारीख सत्र २- मार्च १५ ते १८ सत्र ३ - एप्रिल २७ ते ३० सत्र ४ - मे २४ ते २८ मागील वर्षी, "जनरल रँक यादी" (CRL) मधील अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांची जेईई कट ऑफ टक्केवारी 90.3765335 होती, जी 2019 मध्ये 89.7548849 होती. तथापि, आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग (ईडब्ल्यूएस), अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि अपंग व्यक्ती (पीडब्ल्यूडी) कट-ऑफ स्कोअरमध्ये इतर सर्व श्रेणींमध्ये घट दिसून आली. एनटीएने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारीत झालेल्या जेईई मेन २०२० ला १०.६ लाख आणि सप्टेंबरमध्ये ६.३५ लाख विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. 2019 आणि 2020 ची कट ऑफ यादी सर्वसाधारण(सीआरएल) / सामान्य श्रेणी - 89.7548849 (2019), 90.3765335 (2020) आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग (ईडब्ल्यूएस) - 78.2174869 (2019), 70.2435518 (2020) इतर मागासवर्गीय (ओबीसी-एनसीएल) - 74.3166557 (2019), 72.8887969 (2020) अनुसूचित जाती (एससी) - 54.0128155 (2019), 50.1760245 (2020) अनुसूचित जमाती (एसटी) - 44.3345172 (2019), 39.0696101 (2020) अपंगत्व (पीडब्ल्यूडी) -0.1137173 (2019), 0.0618524 (2020)


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ZYb3Px
via IFTTT

Post a Comment

0 Comments