दहावी, बारावी परीक्षा ऑफलाइनच

मुंबई : राज्यात इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाइन घेण्यात येणार आहेत, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत गुरुवारी स्पष्ट केले. दहावीसाठी सुमारे १६ लाख आणि बारावीसाठी १५ लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना गायकवाड म्हणाल्या, 'शिक्षण विभागामार्फत याबाबत विविध मुद्यांवर चर्चा केली जात आहे. दोन्ही इयत्तांच्या परीक्षा ऑफलाइन घेण्याचे ठरविण्यात आले आहे. करोनामुळे गेले शैक्षणिक वर्ष अडचणीचे गेले आहे. अद्यापही राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राथमिकता देताना परीक्षा कशा पद्धतीने आणि सुरक्षितपणे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १५ मार्च पासून विविध विषयांसंदर्भात माहिती पोहचविण्याचा प्रयत्न आहे.' अन्य मंडळांच्या परीक्षांच्या तारखा पाहूनच वेळापत्रक तयार केल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38fpYJQ
via IFTTT

Post a Comment

0 Comments