Also visit www.atgnews.com
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये भरती; आजच करा अर्ज
बँक नोकरीसाठी तयारी करीत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने जनरलिस्ट ऑफिसर पदावर भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २२ मार्च २०२१ पासून सुरू झाली आहे, इच्छुक आणि पात्र उमेदवार ६ एप्रिल २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. रिक्त स्थान तपशील, शैक्षणिक पात्रता आणि बँक भरतीचे शुल्क यासारखी महत्वाची माहिती या वृत्तात पुढे देण्यात येत आहे. रिक्त पदांचा तपशील बँक ऑफ महाराष्ट्रकडे जनरलस्टिस्ट ऑफिसर पदासाठी एकूण १५० पदे रिक्त आहेत. यात अनारक्षित प्रवर्गासाठी ६२, ओबीसीसाठी ४०, एससीसाठी २२, ईडब्ल्यूएससाठी १५ आणि एसटी प्रवर्गासाठी ११ रिक्त पदांचा समावेश आहे. अर्जासाठी पात्रता कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून कोणत्याही विषयात किमान ६०% गुणांसह पदवीधर पदवी असणे आवश्यक आहे किंवा मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठ / संस्थांकडून सीए / आयसीडब्ल्यूए / सीएफए / एफआरएमसारखे व्यावसायिक कोर्स केलेला असावा. त्याव्यतिरिक्त कोणत्याही अनुसूचित व्यावसायिक बँकेत अधिकारी म्हणून ३ वर्षांचा कामाचा अनुभव असणे अनिवार्य आहे. वयोमर्यादा २५ ते ३५ वर्षे वयोगटातील उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. तथापि, सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयाची सवलत लागू होईल. निवडलेल्या उमेदवारांना दरमहा, ४८,१७० रुपये व इतर भत्ते वेतनातून किती पगार मिळतील. अधिक सविस्तर माहितीसाठी उमेदवार बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत संकेतस्थळाला bankofmaharashtra.in ला भेट देऊन अधिसूचना वाचू शकतात. अर्ज शुल्क बँक ऑफ महाराष्ट्र रिक्रूटमेंट 2021 साठी सर्वसाधारण श्रेणीसाठी शुल्क ११८० रुपये असेल. अनुसूचित जाती / जमाती उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ११८ रुपये करण्यात आले आहे. महिला आणि दिव्यांग उमेदवारांसाठी (PwBD) अर्ज प्रक्रिया नि:शुल्क आहे. निवड प्रक्रिया IBPS मार्फत घेण्यात येणारी ऑनलाइन परीक्षा उमेदवारांना द्यावी लागेल. परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या रँकिंगच्या आधारे १:४ च्या गुणोत्तरात मुलाखतीच्या फेऱ्यांसाठी बोलवले जाईल. दोन्ही परीक्षांच्या आधारे निवडलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2QyzaTI
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments