Also visit www.atgnews.com
CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; वाचा बोर्डाच्या नव्या गाइडलाइन्स
Board Exams 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) विद्यार्थ्यांना आगामी बोर्ड परीक्षांसाठी मोठा दिलासा दिला आहे. देशातील विविध राज्यात कोविड -१९ चे वाढते संक्रमण लक्षात घेता मंडळाने हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात cbse.nic.in या संकेतस्थळावरही नोटीस जारी केली आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे प्रात्यक्षिक परीक्षा आणि थिअरी परीक्षांसाठी केंद्र बदलण्याची संधी दिली आहे. सीबीएसईने कळवले आहे की कोविड साथीच्या आजारामुळे अनेक विद्यार्थी आपल्या कुटुंबीयांसह दुसर्या शहरात / देशात गेले आहेत. त्यामुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल व थिअरी परीक्षांचे केंद्र बदलण्याचा पर्याय देण्यात येत आहे. मंडळाने यासाठी काही अटी, नियम दिले आहेत. तपशील या वृत्तात पुढे देण्यात आला आहे. CBSE Board Exam Centre Change: हे आहेत निर्देश - - विद्यार्थ्यांना सीबीएसईने बोर्ड परीक्षेसाठी रोल नंबर जारी केला असेल. - विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत थिअरी / प्रॅक्टिकल परीक्षा केंद्र बदलण्याची विनंती करावी लागेल. विनंती दाखल करताना, कोणत्या - शहरामध्ये (राज्यात) त्याला / तिला केंद्र हवे आहे हे देखील सूचित करणे आवश्यक आहे. - विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या विनंतीच्या आधारे, शाळा वेबसाइटवर त्याच्या शाळेच्या खात्यात लॉग इन करून विद्यार्थ्यांची माहिती भरेल. - तुम्ही थिअरी आणि प्रॅक्टिकल या दोहोंचे परीक्षा केंद्र बदलू इच्छित असल्यास तरीही तुम्ही दोघांसाठी एकाच शहराची निवड करू शकता. स्वतंत्र केंद्रांना परवानगी दिली जाणार नाही. - आपल्या विनंतीच्या आधारे, सीबीएसई आपल्या निवडलेल्या शहर किंवा आसपासच्या शहरातील परीक्षा केंद्राचे वाटप करेल. अंतिम निर्णय फक्त सीबीएसईचा असेल. - पर्याय काळजीपूर्वक भरा, कारण परीक्षा केंद्र बदलण्याची दुसरी संधी मिळणार नाही. सीबीएसईने सांगितले आहे की प्रॅक्टिकल परीक्षांचे गुण त्याच शाळांच्या दिशानिर्देशांनुसार अपलोड केले जातील, जेथे विद्यार्थी परीक्षा देतील. परीक्षा केंद्र बदलल्यास, ज्या शाळेतून तुम्ही नोंदणी केली आहे, त्या शाळेत तुमचे नाव किंवा रोल नंबरसमोर 'T' (ट्रान्सफर) लिहिले जाईल. बोर्ड परीक्षेचा निकाल त्याच प्रादेशिक क्षेत्राकडून जाहीर केला जाईल ज्यामध्ये आपले परीक्षा केंद्र असेल. कधीपर्यंत करायची विनंती सीबीएसईने म्हटले आहे की विद्यार्थी २५ मार्च २०२१ पर्यंत शाळेत परीक्षा केंद्र / शहर बदलण्यासाठी विनंती पाठवू शकतात. शाळेला ३१ मार्च २०२१ पर्यंत मंडळाच्या संकेतस्थळावर विनंती अपडेट करावी लागेल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vQ75aJ
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments