Also visit www.atgnews.com
सहकार विभागाच्या लिपिक पदाच्या परीक्षेतही गोंधळ
Sahkar Vibhag Bharti Pariksha: आरोग्य विभागातील भरतीतील परीक्षेतील घोळ चर्चेत असतानाच गुरुवारी ४ मार्च रोजी झालेल्या सहकार विभागाच्या लिपिक पदाच्या परिक्षेतील गोंधळ उघड झाला आहे. काळ्या यादीतील कंपन्यांकडे भरतीप्रक्रियेचे काम सोपविल्यामुळे गोंधळ होत असून, तरुण बेरोजगार हवालदिल झाला आहेत. तरी या परिक्षांची प्रक्रिया रद्द करून आरोग्य विभागाप्रमाणेच सहकार विभागाची परिक्षाही द्वारे घेण्यात यावी, अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे आमदार यांनी आज विधान परिषदेत केली. महाविकास आघाडीकडून राज्यात विविध खात्यातील भरतीप्रक्रिया राबविली जात आहे. मात्र, संबंधित प्रक्रिया राबविण्याचे काम महाआयटीने काळ्या यादीतील कंपन्यांना दिले आहे. त्यामुळे पुण्याच्या बेरोजगाराला नागपूरचे सेंटर, तर नागपूरच्या तरुणाला पुण्याचे सेंटर, प्रश्नपत्रिकांचा फुटलेला गठ्ठा, एका बेंचवर दोन विद्यार्थी आदी गैरप्रकार आरोग्य विभागाच्या परिक्षेत उघड झाले. त्यापाठोपाठ काल सहकार विभागातील लिपिकपदाच्या परिक्षेतील गोंधळही उघड झाला. त्याकडे आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेचे आज `पॉइंट ऑफ इन्फर्मेशन' द्वारे लक्ष वेधले. महाआयटी विभागाने भरती प्रक्रिया राबविण्यासाठी काळ्या यादीतील कंपन्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे या कंपन्यांनी राबविलेली भरती प्रक्रिया तत्काळ रद्द करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सर्व परीक्षा घ्यावात, अशी मागणी आमदार डावखरे यांनी केली.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3sWuGUT
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments